कन्नड सुपरस्टार यशने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. अभिनेता यशने ‘KGF Chapter 1’ या चित्रपटाच्या माध्यमाने प्रेक्षकांच्या मनामध्ये ठसा उमटविला, त्यानंतर याच चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली. नुकतीच त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरू येथे गेले असताना कन्नड चित्रपसृष्टीतील यश, रिषभ शेट्टी, अश्विनी पुनीत राजकुमार आणि विजय किरागांडूर या अभिनेत्यांनी त्यांची राजभवनात भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीतील काही मुद्द्यांवर चर्चा केली. त्यानंतर यशने या भेटीबद्दल माहिती दिली. तो असं म्हणाला, “ज्या पद्धतीने त्यांनी लक्ष देऊन आमचे ऐकले तसेच त्यांच्या डोक्यातील विचार, चित्रपटसृष्टीबद्दलचे मत त्यांनी सांगितले. आम्हाला सरकारकडून कोणत्या अपेक्षा हे त्यांनी काळजीपूर्वक ऐकले. आम्हाला नेमकं काय हवंय तसेच त्यांनी चित्रपटसृष्टीसाठी, देशासाठी काय करता येईल हेदेखील सांगितले.”

‘कांतारा’, ‘केजीएफ’ फेम अभिनेत्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; चित्रपटसृष्टीमधील ‘या’ विषयांवर रंगली चर्चा

तो पुढे म्हणाला. “आम्हाला ही संधी मिळाली त्यामुळे आम्ही आमच्या भावना त्यांच्याकडे व्यक्त केल्या तसेच त्यांनीदेखील आम्हाला कबूल केले आहे कोणत्या ही गोष्टीची गरज भासली तर माझ्याकडे या मी देईन, माझ्यावर त्यांचा प्रभाव पडला आहे, कारण त्यांना भरपूर ज्ञान आहे, त्यांच्याकडे चित्रपटसृष्टीबद्दल छोट्या छोट्या गोष्टींची माहिती आणि काय नेमकं करता येईल हे त्यांना माहित आहे. चित्रपटसृष्टीबद्दल त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे. आमच्या कामाचीदेखील त्यांनी प्रशंसा केली. आमच्यासाठी हा एक अद्भुत अनुभव होता.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान बॉलिवूड हंगामाला मिळालेल्या माहितीनुसार यश आता तिसऱ्या भागात दिसणार नाही. KGF या चित्रपटासाठी त्याने पाच वर्ष मेहनत घेतली होती. दरम्यान यश आता KGF फ्रँचायझीसारख्याच एका चित्रपटावर काम करणार आहे.