सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय बच्चन तिचा पती अभिषेक आणि मुलगी आराध्याबरोबर दिसत आहे. एवढेच नाही तर अभिनेत्री एका गाण्यावर डान्स करतानाही दिसत आहे. याशिवाय हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना खूप राग येत आहे, कारण त्यात गायक राहुल वैद्यदेखील दिसत आहे. चला जाणून घेऊया नेटकऱ्यांनी त्याच्याबद्दल काय म्हटले आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे?

खरंतर राहुल वैद्य, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा व्हायरल होणारा व्हिडीओ आजचा नाही, तर जुना आहे. हा व्हिडीओ नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये शनिवारी रात्री झालेल्या कार्यक्रमाचा आहे. या कार्यक्रमात राहुल वैद्यने ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या ‘बंटी और बबली’ या चित्रपटातील ‘कजरा रे’ हे हिट गाणे गायले. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ऐश्वर्या आणि अभिषेक या गाण्यावर एकत्र नाचताना दिसत आहेत. यावेळी त्यांची मुलगी आराध्यादेखील त्यांच्याबरोबर नाचताना दिसली. बच्चन कुटुंबातील तिन्ही स्टार्सचा लूक पाहण्यासारखा आहे. राहुल वैद्यनेही हा व्हायरल व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनचा हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. एकीकडे, ऐश्वर्या आणि अभिषेक यांना एकत्र नाचताना पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे, तर दुसरीकडे, काही वापरकर्ते राहुल वैद्यला त्यांच्याबरोबर पाहून राग व्यक्त करत आहेत आणि त्याला पुन्हा ट्रोल करत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये गायक राहुल वैद्यला पाहून नेटकऱ्यांना राग आला आणि लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका इन्स्टा युजरने लिहिले की, “अभिषेक बच्चनचे बजेट इतके कमी होते का की त्याने राहुलला गाण्यासाठी बोलावले?”, तर दुसऱ्या व्यक्तीने हसून म्हटले, “तो एक गायक आहे जो लग्नात गातो, चित्रपटांमध्ये प्ले बॅक सिंगर नाही.” याशिवाय, दुसऱ्या एका युजरने लिहिले की तो एक वाईट सिंगर आहे.”

नेटकऱ्यांना राहुलवर राग का आला?

काही दिवसांपूर्वी गायक राहुल वैद्यने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती, ज्यामध्ये त्याने भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीच्या चाहत्यांना विराटपेक्षा मोठे जोकर म्हटले होते, तेव्हापासून विराटचे चाहते राहुल वैद्यला ट्रोल करत आहेत.