scorecardresearch

VIDEO : ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या रायच्या सौंदर्याची जादू, अभिनेत्रीवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा

सध्या सुरु असलेल्या कान्स चित्रपट महोत्सवामधील अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा ग्लॅमरस लूक समोर आला आहे.

75th Cannes Film Festival, Cannes Film Festival 2022 Latest updates,
सध्या सुरु असलेल्या कान्स चित्रपट महोत्सवामधील अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा ग्लॅमरस लूक समोर आला आहे.

७५व्या कान्स चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली आहे. या चित्रपट महोत्सवाची चर्चा आता सगळीकडेच रंगतेय. या महोत्सवाची आणखी एक खासियत म्हणजे रेड कार्पेट. आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचा मानल्या जाणाऱ्या कान्स चित्रपट महोत्सवात कलाविश्वातील अनेक दिग्गज मंडळी हजेरी लावतात. बॉलिवूड कलाकारांनी देखील या चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली आहे. दीपिका पदुकोणपासून ते अगदी नवाजुद्दीन सिद्दीकीपर्यंतची मंडळी रेड कार्पेटवर अवतरली. आता ऐश्वर्या राय बच्चनचा रेड कार्पेटवरील लूक समोर आला आहे.

अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि त्यांची लेक आराध्य बच्चन कान्स चित्रपट महोत्सवाला जाणार म्हटल्यावर त्यांच्या लूकची चाहत्यांना उत्सुकता होती. अखेरीस ऐश्वर्याचा मनमोहक लूक समोर आला आहे. ऐश्वर्याने काळ्या रंगाचा फ्लोरल आणि रफल गाऊन परिधान केला आहे. कान्सच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्याने एण्ट्री करताच तिच्यावरच साऱ्यांच्या नजरा खिळल्या. यादरम्यानचा व्हिडीओ देखील सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – Photos : भारताचा मामे खान ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर; पण ही व्यक्ती नेमकी आहे तरी कोण?

सौंदर्याच्या बाबतीत जगभरातील अभिनेत्रींना मागे टाकणाऱ्या ऐश्वर्याची एक झलक पाहण्यासाठी प्रत्येक जण आतुर असतो. कान्सच्या रेड कार्पेटवर देखील असंच काहीसं घडलं. यावेळी ऐश्वर्याच्या रेड कार्पेट लूकसमोर (Aishwarya Rai Bachchan Cannes red carpet) इतर अभिनेत्रीही फिक्या वाटत होत्या. ऐश्वर्याने या गाऊनवर फक्त चंदेरी रंगाचे आकर्षक कानातले घालणं पसंत केलं.

aishwarya rai bachchan at cannes top gun maverick screening

आणखी वाचा – Raanbaazaar Trailer : “…अन् त्यांच्या कंपनामुळे मोठं वादळ तयार झालं” बहुचर्चित ‘रानबाजार’चा ट्रेलर पाहिलात का?

ऐश्वर्याने २००२मध्ये पहिल्यांदाच कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली होती. या गोष्टीला जवळपास २० वर्ष उलटून गेली आहेत. त्यावेळी तिच्या देवदास चित्रपटाचं स्क्रिनिंग कान्स चित्रपट महोत्सवामध्ये करण्यात आलं होतं. सलग वीस वर्ष ऐश्वर्या कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावत आहे. यंदाच्या तिच्या रेड कार्पेट लूकने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aishwarya rai walks the cannes film festival red carpet in extravagant floral gown photos viral on social media kmd