रजनीकांत यांनी त्यांच्या कामाने संपूर्ण जगभर त्यांच्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्येही त्यांनी यश मिळवलं. रजनीकांत यांच्या अभिनयात अशी जादू आहे की चाहते त्यांना देवाचा दर्जा देतात. वयाच्या ७२ व्या वर्षीही रजनीकांत नव्या कलाकारांना टक्कर देताना दिसतात. त्यांच्या कामाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही ते नेहमी चर्चेत असतात. नुकताच त्यांनी कुटुंबीयांबरोबर पोंगल हा सण साजरा केला. यावेळी त्यांच्या घरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोवर सर्वांच्याच नजरा खिळल्या.

रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या या सोशल मीडियावर सक्रिय राहून नेहमीच त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असतात. आता नुकतेच त्यांनी कुटुंबीयांबरोबर साजऱ्या केलेल्या पोंगल सणाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. दोन्ही मुलांबरोबर त्यांनी आई-वडिलांच्या घरी हा सण सहज साजरा केला.

आणखी वाचा : विजय सेतुपतीला मागावी लागली शाहरुख खानची माफी, खुलासा करत अभिनेता म्हणाला, “मी त्याला…”

यातील पहिल्या फोटोत ऐश्वर्या स्वयंपाक घरात स्वयंपाक करताना दिसत आहेत, दुसऱ्या फोटोत केळीच्या पानावर पक्वान्न वाढताना दिसत आहेत, तिसऱ्या फोटो त्या गाईला नैवेद्य दाखवताना दिसत आहेत, तर चौथा फोटो त्या त्यांचे आई-वडील म्हणजेच रजनीकांत आणि लता यांचे आशीर्वाद घेताना दिसत आहेत. त्यांनी पोस्ट केलेल्या या शेवटच्या फोटोमध्ये रजनीकांत यांच्या घरात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसत आहे.

हेही वाचा : रजनीकांत यांची आजवर कोणाला माहीत नसलेली अधुरी प्रेमकहाणी…घ्या जाणून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रजनीकांत यांची मातृभाषा मराठी आहे. दक्षिणात्य चित्रपटातून काम करत जगभर प्रसिद्धी मिळालेले अभिनेते रजनीकांत हे आज आजही त्यांचं मूळ विसरलेले नाहीत. त्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नितांत आदर आणि प्रेम आहे. आता त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. आता यावर त्यांचे चाहते विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.