अजय देवगण दिग्दर्शित ‘मे डे’ सिनेमाचं नाव बदललं, ‘या’ नावाने होणार सिनेमा प्रदर्शित

‘रनवे ३४’ हा सिनेमा २०२२ सालामधील ईदला म्हणजेच २९ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे

MayDay

अजय देवगणचं दिग्दर्शन असलेल्या ‘मेडे’ या सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती. मात्र आता या सिनेमाचं नाव बदललं आहे. या सिनेमाचं नाव आता ‘रनवे ३४’ असं करण्यात आलंय. अजय देवगणने सिनेमाच्या बदललेल्या नावाची घोषणा केली आहे. या शिवाय सिनेमातील मुख्य कलाकार म्हणजे स्वत: अजय देवगण तसचं अमिताभ बच्चन आणि रकुल प्रीत सिंहचा सिनेमातील फर्स्ट लूकदेखील शेअर केलाय. याशिवाय त्याने सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

अजय देवगणने सोशल मीडियावर सिनेमातील कलाकारांचा फर्स्ट लूक शेअर केलाय. हे फोटो शेअर करत त्याने लिहिलं, “मे-डे आता ‘रनवे ३४’ झाला आहे. हा थ्रीलर सिनेमा खऱ्या घटनांशी प्रेरित आहे असून तो माझ्या खूप जवळचा आहे. यामागे अनेक कारणं आहेत. यासोबतच त्याने एक नोटही शेअक केलीय. यात त्याने लिहिलं, ” आपले डोळे बंद करा आणि त्या क्षणांचा विचार करा जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतोच… तो म्हणजे जेव्हा आपल्याला आपण संपूर्ण जग जिंकलो आहोत असं वाटतं मात्र दुसऱ्याच क्षणी आपण खूप हताश झाल्यासारखं वाटतं”

शमितावर ‘ती’ कमेंट केल्याने देवोलीनावर सलमान खान संतापला


या सिनेमाच्या पोस्टरवरुनच सिनेमात अजय आणि रकुल एका वैमानिकाच्या भूमिकेत झळकणार असल्याचं स्पष्ट होत आहे. तर अमिताभ बच्चन मात्र कोणत्या भूमिकेत झळकणार हे अद्यार गुलदस्त्यामध्ये आहे.


‘रनवे ३४’ हा सिनेमा २०२२ सालामधील ईदला म्हणजेच २९ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. सिनेमात बिग बी आणि रकुल प्रीत सिंह सोबतच बोमन ईरानी, अकांक्षा स‍िंह, अंगीरा धर हे कलाकारही झळकणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ajay devgan amitabh bachchan may day film name change now ranway 34 kpw

ताज्या बातम्या