‘बिग बॉस १५’ सिझनमध्ये राखी सावंतसह देवोलीना भट्टाचार्जी आणि रेश्मी देसाईच्या एण्ट्रीनंतर अनेक घडामोडी घडू लागल्या आहेत. खास करून देवोलीनाने घरात प्रवेश केल्यापासूनच शमिता शेट्टीवर निशाणा साधण्यास सुरुवात केलीय. वीकेण्ड का वार या खास भागातही देवोलीनाने शमिता शेट्टीवर निशाणा साधला होता. मात्र शमिताला सुनावणं देवोलीनालाच महागात पडलं. देवोलीनाच्या वागण्यावर सलमान खान चांगलाच संतापला होता.

शमिता शेट्टीला टार्गेट करणाऱ्या देवोलीनाची सलमान खानने शाळा घेतली आहे. देवोलीनाने शिमितावर केलेल्या एका कमेंटमुळे सलमान खान तिच्यावर संतापला. एका टास्कमध्ये देवोलीनाने शमिताला किडा म्हंटलं. न आवडणाऱ्या स्पर्धकासाठी या टास्कमध्ये स्लोगन तयार करायचं होतं. ज्यात देवोलीना शमितासाठी एक स्लोगन तयार केलं. ज्यात ती म्हणाली, “शमिता हैं ऊपर से हीरा, पर अंदर से हैं कीड़ा”. देवोलीनाची ही कमेंट ऐकून शमिताला धक्काच बसला.

“संपूर्ण जग बदललं”, ‘केबीसी’चे एक हजार एपिसोड पूर्ण झाल्यानंतर बिग बी भावूक

शमितानेही देवोलीनाला सडेतोड उत्तर दिलं. ती म्हणाली, ‘खुद को समझ मत तू सबसे टॉप, देवोलीना तू है सबसे फ्लॉप’ हे ऐकल्यावर भडकलेल्या देवोलीनाने शमितावर निशाणा साधला. तिने शमिताला नको ते सुनावण्यास सुरुवात केली. मात्र यावेळी सलमान खानने दवोलीनाला थांबवत तिला चांगलंच सुनावलं. “देवोलीना या शोमध्ये आल्यापासूनच तू शमिताच्या मागे पडली आहे. असं वाटतंय की तुला शमितामुळे असुरक्षित वाटतं. शमितावर टीका करून तू प्रकाशझोतात येण्याता प्रयत्न करत आहे.” असं म्हणत सलमानने देवोलीनाची शाळा घेतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर रविवारच्या या खास भागात अभिनेता सुनिल शेट्टी मुलगा अहानसोबत त्याच्या तडप या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आला होता.त्यासोबत नेहा धुपियाने देखिल स्पर्धकांची शाळा घेतली.