चित्रपटांमध्ये अभिनय करण्याव्यतिरिक्त, काही कलाकार व्यवसाय करण्यासाठीदेखील प्रसिद्ध आहेत, अनेक बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्रींचे खूप मोठे व्यवसाय आहेत.
बॉलीवूडचे कपल अजय देवगण आणि काजोल हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक आहेत. हे जोडपे मुंबईत शिवशक्ती नावाच्या त्यांच्या बंगल्यात राहतात, ज्याची किंमत ६० कोटी रुपये आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या या जोडप्याने बरीच संपत्ती जमवली आहे.
GQ नुसार, या जोडप्याचे लंडनमध्येदेखील एक आलिशान घर आहे. उत्तर गोव्यात त्यांचा एक आलिशान व्हिला आहे, ज्याला त्यांनी व्हिला एटरना असे नाव दिले आहे. काजोल आणि अजय गोव्यात त्यांच्या सुट्टीत जातात, तर या जोडप्याने ही मालमत्ता गेस्टसाठीदेखील खुली केली आहे. व्हिला एटरना अतिशय आलिशान पद्धतीने सजवलेला आहे आणि आतील दृश्य पाहून एखाद्या व्यक्तीला असे वाटेल की तो एखाद्या आलिशान ठिकाणी बसला आहे.
अजय देवगण आणि काजोलने कर्ली टेल्ससाठी व्हिला एटरनाचे दरवाजे उघडले होते. हा व्हिला उत्तर गोव्यातील मोइरा गावाजवळ आहे. हा व्हिला पोर्तुगीज स्टाईलमध्ये बांधला गेला आहे आणि त्यात सर्व मॉर्डन सुविधा आहेत. तुम्ही व्हिलामध्ये प्रवेश करताच, तुमचे स्वागत प्रथम एका मोठ्या स्विमिंग पूलद्वारे केले जाते. हे घर स्विमिंग पूलभोवती बांधलेले आहे. व्हिला हिरव्यागार झाडांनी वेढलेला आहे आणि रहिवाशांना एकांतदेखील मिळतो. स्विमिंग पूलजवळ एक लॉन आहे जो हिरवळीने भरलेला आहे, त्यात एक बागदेखील आहे. लॉनच्या शेजारी, घरामध्ये शंभर वर्षे जुनी विहीरदेखील आहे.

या व्हिलामध्ये पाच बेडरूम आहेत आणि प्रत्येक खोली वेगळ्या स्टाईलमध्ये बांधलेली आहे. सर्व खोल्या आरामदायी आणि सुंदर आहेत आणि लाकडी बेड आणि सोफे आहेत. प्रत्येक खोलीतून हिरव्यागार लॉन आणि स्विमिंग पूलचे सुंदर दृश्य दिसते.

या व्हिलामध्ये एक मोठा डायनिंग एरियादेखील आहे. हा व्हिला जितका मोठा दिसतो तितकाच तो सुंदर आणि सुसज्ज आहे. हा व्हिला बाहेरून जितका सुंदर दिसतो तितकाच तो आतूनही सुंदर आहे. यात एक मोठा वॉटर वॉल फाउंटन आहे, जो समुद्रकिनाऱ्यासारखा अनुभव देतो आणि पाण्याचा आवाज त्याला शांत वातावरण देतो. तर एटरनाचे एका रात्रीचे भाडे सुमारे ७५,००० हजार रुपये आहे.