बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि पत्नी ट्विंकल खन्नाची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. ते सध्या मुलगी नितारासोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. अक्षय आणि ट्विंकल हे दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. दरम्यान, ट्विंकलचा २९ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते सगळे मालदीवला गेले आहेत.

अक्षयने आणि ट्विंकलने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही व्हिडीओ शेअर केले आहेत. अक्षयने शेअर केलेल्या व्हिडीओत तो मालदीवमध्ये सायकल चालवत आहे. त्यासोबत त्या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला अतरंगी रे या त्याच्या चित्रपटातील रेत जरा सी हे गाणं प्ले होत आहे. ट्विंकलने शेअर केलेल्या व्हिडीओत ती तिच्या मुलीसोबत दिसते. हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

आणखी वाचा : घटस्फोटानंतर समांथा आणि नागा चैतन्य पहिल्यांदाच आले समोरा-समोर अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा : Big Boss Marathi 3 जिंकल्यानंतर विशाल निकम अडकणार लग्न बंधनात?

ट्विंकल ही बॉलिवूडचे सुपरस्टार राजेश खन्ना यांची मुलगी आहे. ट्विंकलचा जन्म २९ डिसेंबर १९७३ रोजी झाला आहे. २००१ मध्ये ट्विंकलने अक्षय कुमारशी लग्न केले. ट्विंकल एक अभिनेत्री असून ती एक लेखिका देखील आहे.