अक्षय कुमारसह रोहित शेट्टीला धक्का, प्रदर्शनाच्या काही तासातच ‘सूर्यवंशी’ लीक

बहुप्रतिक्षित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट आज ५ नोव्हेंबरला देशभरातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.

Sooryavanshi, Antim, cinema halls, Maharashtra cinema halls,

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट आज ५ नोव्हेंबरला देशभरातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. भारतासह इतर अनेक देशातील जवळपास ४ हजार स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. पण आज अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाची स्तुती चाहते करत आहेत. मात्र, या सगळ्यात चित्रपट लीक झाल्याची बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट अनेक वेबसाईट्सवर लीक झाला आहे. यात तमिलरॉकर्स, फिल्मीवॅपसारख्या अनेक पाइरेटेड साइट्सवर हा चित्रपट लीक झाल्याचे बोललं जात आहे. हा चित्रपट इंटरनेटवर फ्री डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असून तो सुद्धा एचडी प्रिंटमध्ये असल्याचे समोर येत आहे. यामुळे चित्रपटच्या कलाकारांसह निर्मात्यांनाही धक्का बसला आहे.

या चित्रपटासाठी एकूण जवळपास २२५ कोटी इतका खर्च आल्याचे बोललं जात आहे. या चित्रपटाची निर्मिती २०० कोटी रुपयात करण्यात आली असून त्याच्या प्रमोशनसाठी २५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे जर हा चित्रपट लीक झाला तर निर्मात्यांना कोट्यावधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

आजपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार

‘सूर्यवंशी’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट बघत आहे. मात्र कोरोनामुळे या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात येत होती. अखेर आज ५ नोव्हेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमारसोबत अजय देवगण आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्याचसोबत बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Akshay kumar katrina kaif rohit shetty sooryavanshi full hd movie leaked online nrp

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या