प्रियांका चोप्रा तिच्या अभिनयाच्या जोरावर आज सातासमुद्रापलिकडे पोहोचली आहे. तिने एकापेक्षा एक उत्तम भूमिका रुपेरी पडद्यावर साकारल्या. इतकंच नव्हे तर प्रियांकाने नकारात्मरक भूमिका साकारत प्रेक्षकांचं मन जिंकलं. प्रियांकाचा ‘ऐतराज’ हा त्यापैकीच एक चित्रपट. या चित्रपटामध्ये तिने साकारलेली भूमिका अधिक लोकप्रिय ठरली. पण ‘ऐतराज’साठी जेव्हा तिला विचारण्यात आलं तेव्हा तिची प्रतिक्रिया काही वेगळीच होती.

आणखी वाचा – Video : पंजाबमध्ये कारखाना, रिसॉर्ट, लाखो रुपयांची कमाई अन्…; टीव्ही शो व्यतिरिक्त भारती सिंह करते ‘हा’ व्यवसाय

‘ऐतराज’मध्ये प्रियांका आणि अक्षय कुमार यांनी एकत्र काम केलं. पण जेव्हा या चित्रपटासाठी दोघांनाही विचारण्यात आलं तेव्हा दोघंही हा चित्रपट करण्यास तयार नव्हते. याबाबत निर्माते-दिग्दर्शक सुनिल दर्शन यांनी खुलासा केला आहे. सुनिल यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्रियांका-अक्षयच्या ‘ऐतराज’बाबत सांगितलं आहे.

ते म्हणाले, “अक्षय आणि प्रियांका दोघंही ‘ऐतराज’ चित्रपट करण्यास तयार नव्हते. प्रियांकाला या चित्रपटामधील भूमिकेसाठी जेव्हा मी विचारलं तेव्हा ती रडू लागली. त्याच विचारामध्ये प्रियांका घरी गेली आणि झोपली. त्यानंतर माझ्या ऑफिसमध्ये येऊन मला भेट असं मी प्रियांकाला सांगितलं. तिला मी ‘ऐतराज’मधील तिच्या भूमिकेचं महत्त्व पटवून दिलं आणि हा चित्रपट करण्यासाठी प्रियांकाला तयार केलं.”

आणखी वाचा – लग्न, घटस्फोट, दोनवेळा गर्भपात, कर्करोग अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरीचा खासगी आयुष्याबाबत खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आधी हा चित्रपट करण्यास प्रियांका तयार जरी नसली तरी तिने ‘ऐतराज’मध्ये काम करत स्वतःला अभिनेत्री म्हणून सिद्ध केलं. २००४मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या चित्रपटानंतर एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये प्रियांकाने काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.