scorecardresearch

अक्षय कुमारच्या चित्रपटांना प्रेक्षक मिळेना, सलग तीन चित्रपट सुपरफ्लॉप ठरल्यानंतर ‘रक्षाबंधन’लाही थंड प्रतिसाद

अभिनेता अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आहे.

अक्षय कुमारच्या चित्रपटांना प्रेक्षक मिळेना, सलग तीन चित्रपट सुपरफ्लॉप ठरल्यानंतर ‘रक्षाबंधन’लाही थंड प्रतिसाद
अभिनेता अक्षय कुमारचा 'रक्षाबंधन' चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आहे.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बहुचर्चित ‘रक्षाबंधन'(Rakshabandhan) चित्रपट गुरुवारी (११ ऑगस्ट) प्रदर्शित झाला. आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ आणि अक्षयचा चित्रपट एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर दाखल झाले. कोणता चित्रपट सर्वाधिक कमाई करणार तसेच कोणत्या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळणार याबाबत अनेक चर्चा रंगत होत्या. पण आता काही वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. आमिर पाठोपाठ अक्षयच्या ‘रक्षाबंधन’ चित्रपटाकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे.

आणखी वाचा – आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’चे शो रद्द, जबरदस्त प्रमोशन, अधिक मेहनत करूनही सुपरफ्लॉप ठरला चित्रपट

रक्षाबंधन सणाच्या ऐनमोक्यावर अक्षयचा नवा चित्रपट प्रदर्शित झाला. भाऊ-बहिणीच्या नात्यावर आधारित चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर गर्दी करतील असा अंदाज वर्तावला जात होता. मात्र या चित्रपटालाही थंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पहिल्या दिवशी ‘रक्षाबंधन’ने फक्त ९ कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी ६ कोटी रुपये इतपत या चित्रपटाची कमाई होती.

१५ ऑगस्ट आणि विकेण्डचा चित्रपटाला फायदा होईल अशी सध्या चर्चा आहे. पण शनिवारी (१३ ऑगस्ट) देखील अक्षयच्या या चित्रपटाने निराशाजनक कामगिरी केली. प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर ६ ते ७ कोटींचा गल्ला जमावला. आतापर्यंत अक्षयच्या या बहुचर्चित चित्रपटाने २१.६० कोटी रुपयांची कमाई कली आहे. अक्षयच्या इतर सुपरहिट चित्रपटांच्या तुलनेमध्ये हा आकाडा फारच कमी आहे.

आणखी वाचा – “३० पेक्षा अधिक मराठी, हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले पण…” ‘सरसेनापती हंबीरराव’च्या टीमने शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

‘सम्राट पृथ्वीराज’, ‘बच्चन पांडे’, ‘बेल बॉटम’ असे अक्षयचे एकापाठोपाठ एक तीन चित्रपट सुपरफ्लॉप ठरले. त्याचा हा सुपरफ्लॉप ठरलेला चौथा चित्रपट आहे. इतकंच नव्हे तर सतत चित्रपटांना मिळालेलं अपयश पाहून अक्षय खचला नाही. सध्या त्याच्या हाती ५ ते ६ चित्रपट आहेत. प्रेक्षक अक्षयच्या सुपरहिट चित्रपटांच्या प्रतिक्षेत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Akshay kumar rakshabandhan movie box office collection day 3 and film got worse response from audience see details kmd

ताज्या बातम्या