बॉलिवुडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट येत्या ३ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच उत्तर प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट उत्तर प्रदेशमध्ये करमुक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> “मुघलांसोबत, आपल्या राजांचाही इतिहास अभ्यासक्रमात असावा…”, अक्षय कुमारचे वक्तव्य चर्चेत

अक्षय कुमारने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी सम्राट पृथ्वीराज या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित केले होते. योगी आदित्यनाथ यांनी हा चित्रपट पाहिला असून त्याचे कौतुक केले आहे. त्यांनी हा चित्रपट उत्तर प्रदेश राज्यात करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी अक्षय कुमारने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासाठीदेखील स्पेशल स्क्रीनिंगचे आयोजन केले होते. अमित शाह यांनीदेखील या चित्रपटाचे कौतुक केले आहे.

हेही वाचा >>> केकेच्या निधनानंतर इमरान हाश्मी ट्विटरवर होतोय ट्रेंड, पण यामागचं नेमकं कारण काय?

योगी आदित्यनाथ हा चित्रपट पाहून प्रभावित झाले आहेत. या चित्रपटनिर्मितीबद्दल त्यांनी दिग्दर्शक तसेच चित्रपटाच्या चमुचे अभिनंदन केले. “अक्षय कुमारने इतिहास उत्तमरित्या दाखवला आहे. याच कारणामुळे मी त्याचे अभिनंदन करु इच्छितो,” अशी प्रतिक्रिया आदित्यनाथ यांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर दिली.

हेही वाचा >>> अक्षय कुमारने सांगितलं मोदींची मुलाखत घेण्यामागील कारण; म्हणाला, “मोदीजी घड्याळ उलटं का घालतात हे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला सम्राट पृथ्वीराज हा चित्रपट राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे. अक्षय कुमारसोबत मानुषी छिल्लर या अभिनेत्रीनेदेखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारलेली आहे. तसेच या चित्रपटात संजय दत्त आणि सोनू सूद यांच्याही भूमिका आहेत. सम्राट पृथ्वीराज हा चित्रपट येत्या ३ जून रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये संपूर्ण भारतभर प्रदर्शित होणार आहे.