Akshaya Deodhar-Hardeek Joshi Marriage: अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांच्या लग्नाचा थाट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून घरोघरी पोहचलेल्या या जोडीने पुण्यात पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधली. हातमागावर विणलेल्या लाल पैठणीत पाठक बाई व लाल धोतर आणि कुर्ता परिधान केलेल्या राणा दाने सोशल मीडिया पार दणाणून सोडलं होतं. रिल लाईफमधली ही जोडी आता रिअल लाईफमध्येही पती-पत्नी झाले आहेत. राणादा व अंजली बाईंच्या लग्नाच्या विविध विधी व कार्यक्रमाचे फोटो व्हिडीओ सध्या समोर येत आहेत. यातील एक व्हिडीओ पाहून तर नेटकरी हा राणादा नाहीच असे म्हणत आहेत, हा नेमका काय व्हिडीओ आहे, चला पाहूयात..

राणादा व पाठक बाईंच्या लग्नाआधी धमाकेदार संगीत कार्यक्रम पार पाडला. यावेळी दोघांनी वेस्टर्न लुक केलेला होता. याच कार्यक्रमात राणा दा ने रणवीर सिंहच्या बाजीराव मस्तानी चित्रपटातील गाण्यावर ठेका धरला होता. रणवीरच्या गाजलेल्या मल्हारी गाण्यावर थिरकताना राणा दा इतका बेभान झाला की तो जमिनीवर बसून अक्षरशः हात आपटून नाचू लागला. राणादाचा हा डॅशिंग लुक पाहून नेटकऱ्यांनीही मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

राणादा जमिनीवर बसला आणि..

View this post on Instagram

A post shared by Pratik Patil (@pratik_n_patil_)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राणादा व पाठक बाईंच्या लग्नात एकूणएक सर्व विधी व लुक, इतकंच नव्हे तर हॅशटॅग #अहा सुद्धा सोशल मीडियावर हिट ठरले होते. तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या दरम्यान या जोडीचे प्रेम जुळले होते. २०१६ ते २०२१ या काळात ही मालिका घरोघरी पोहोचली होती. २०२२ मध्ये अक्षय्य तृतीयाला अक्षया व हार्दिकचा साखरपुडा पार पडला व आता डिसेंबरमध्ये या जोडीने नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.