Alia Bhatt- Ranbir Kapoor Pregnancy News : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर १४ एप्रिल रोजी लग्न बंधनात अडकले. तरी सुद्धा अजूनही त्यांच्या लग्नाच्या चर्चा या सुरुच आहेत. या सगळ्यात आता आलिया आणि रणबीरने त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. आलिया आई होणार आहे.

आणखी वाचा : घटस्फोटाच्या चर्चेत सिद्धार्थ जाधवने पत्नी तृप्तीसोबत शेअर केला फोटो

आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. आलियाने शेअर केलेल्या या फोटोत ती रुग्णालयात असल्याचे दिसत आहे. याशिवाय त्या फोटोत रणबीर आलियाच्या बाजुला असल्याचे दिसत आहे. याशिवाय आलियाने नवीन पाहुण्याची चाहूल दर्शवणारा तिने सिंहाच्या कुटुंबाचा प्रातिनिधक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत “आमचं बाळं लवकरच येतं आहे”, असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : ‘Love You’, अखेर सई ताम्हणकरने प्रेमाची दिली कबुली, दौलतरावांच्या ‘त्या’ पोस्टवर केली कमेंट

पाहा फोटो :

आणखी वाचा : वडील अभिषेकचा डान्स कसा वाटला? मनिष पॉलच्या प्रश्नावर आराध्याने दिले असे उत्तर

आलियाने शेअर केलेल्या या पोस्टवर चित्रपटसृष्टीतील अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आलियाची आई सोनी राजदान यांनी आलियाच्या पोस्टवर ‘तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा’. तर करण जोहरने ‘आनंद हृदयात मावत नाही’. प्रियांकाने तुम्हाला शुभेच्छा,’ मी प्रतिक्षा करू शकत नाही.’ अशी कमेंट केली आहे.

आणखी वाचा : आलियाशी लग्न करण्याआधीच विवाहित आहे रणबीर? पहिल्या पत्नीबाबत केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रणबीर आणि आलिया लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट पहिला भाग आहे आणि याचे आणखी दोन भाग येणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन यांच्याही भूमिका आहेत.