अभिनेत्री आलिया भट्ट ही पदार्पणापासूनच काही ना काही कारणाने चर्चेत राहिलेली अभिनेत्री आहे. एका मागून एक सुपरहिट चित्रपट देऊन तिने इंडस्ट्रीत स्वतःचं नाणं खणखणीत वाजवलं आहे. आजही आलियाचं नाव बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं. त्यामुळे आलियाच्या प्रत्येक हालचालींकडे चाहत्यांचं बारीक लक्ष असतं.

काही दिवसांपूर्वीच आलियाने ती आई होणार असल्याचे जाहीर केल्यापासून ती सातत्याने चर्चेत आहे. रणबीर आलियाच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचे आगमन कधी होणार? याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागली आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासून सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चा रंगत आहेत. पण आता सोशल मीडियावर होणाऱ्या वेगवेगळ्या चर्चांना आलिया खूप त्रासली असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतचं एका मुलाखतीत तिने याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. नुकतीच तिने ‘मॅशबल इंडिया’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या गरोदरपणाच्या चर्चांवर नाराजीचा सूर लावला.

आणखी वाचा : चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीचं अनुराग कश्यपनं केलं समर्थन, कारण देत म्हणाला…

यात ती म्हणाली, “माझं बेबीबंप किती आहे, बाळाची काळजी मी कशी घेणार आहे, मी कोणते कपडे परिधान करते यावर चर्चा करणं कृपया बंद करा. मी या कोणत्याच गोष्टींचा परिणाम स्वतःवर करुन घेत नाही. या बातम्यांवर चर्चा करणाऱ्यांकडे बातम्या संपल्या असाव्यात त्यामुळेच त्यांनी सगळीकडे माझी चर्चा सुरु केली आहे. आधी माझं लग्न झालं मग त्यावरुन नवविवाहित आलिया यावर चर्चा सुरु होती. आता मी प्रेग्नंट आहे तर त्याविषयी बरीच चर्चा सुरु आहे. हे फार विनोदी आहे.

“मी काय कपडे घातले, मी कशी दिसते, कशी वावरते हा माझा खासगी प्रश्न आहे. त्यामुळे मी जे कपडे घालते ते मला सगळ्यांसमोर मिरवण्याची गरज वाटत नाही”, असेही तिने सांगितले. त्यासोबतच तिने तिच्या प्रेग्नन्सीच्या चर्चा थांबवा असं आवाहनही केलं आहे.

हेही वाचा : आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचं बेबीमून, सोनम कपूरच्या कमेंटने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान आलिया लवकरच डार्लिंग्ज या चित्रपटात झळकणार आहे. त्यासोबतच ती तिच्या आगामी ब्रम्हास्त्र या चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही व्यस्त आहे. विशेष म्हणजे इतके व्यस्त वेळापत्रक असतानाही आलिया ही सध्या रणबीरसोबत बेबीमूनसाठी इटलीला गेली आहे. ती तिकडे छान सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे.