बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आलिया गेल्या काही दिवसांपासून ‘गंगूबाई काठियावाडी’ या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. लवकरच या चित्रपटाचा ‘बर्लिन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये प्रीमियर होणार आहे. आता आलियाने या चित्रपटावर तिचे वडील महेश भट्ट यांची कशी प्रतिक्रिया होती हे सांगितलं आहे.

आलियाने या चित्रपटात माफिया क्वीन गंगूबाई यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेमुळे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. बर्लिन होणारा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा आलियाचा तिसरा चित्रपट असेल. एका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या महत्त्वाविषयी बोलताना आलिया एका मुलाखतीत म्हणाली, “जेव्हा पण तुम्ही या महोत्सवाला जाता, तेव्हा तुमचा चित्रपट हा देशाबाहेर नेण्यासारखा असतं, मानसिकदृफिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर ष्ट्या तुम्हाला असं वाटतं की हा अशा प्रकारचा चित्रपट आहे, ज्यात भारतीय कथा आहे आणि सर्वांचे लक्ष वेधणार आहे. माझा विश्वास आहे की गंगूबाईमध्ये ती क्षमता आहे, ती कथा या चित्रपटात आहे.”

आणखी वाचा : मलायकाला मुलगा अरहान आई म्हणून नाही तर ‘या’ नावाने मारतो हाक

आलिया तिचे वडील महेश भट्ट यांची प्रतिक्रिया सांगत पुढे म्हणाली, “माझ्या बाबांनी हा चित्रपट पाहिला. तेव्हा ते मला म्हणाले “हा चित्रपट आंतरराष्ट्रीय दर्जेचा असून हा त्या प्रेक्षकांच्या मनात राज्य करेल. आमचं हे सगळं बोलणं चित्रपट बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर होणार असल्याची माहिती मिळण्या आधी झालं होतं आणि तसचं झालं. “

आणखी वाचा : सरळसाध्या अरुंधतीचे अचानक बदललेले रुप पाहून आशुतोष झाला आवाक?

आणखी वाचा : ‘पुष्पा’च्या श्रीवल्ली गाण्याची परदेशातही क्रेझ, इंग्लिश व्हर्जनचा व्हिडिओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटात अजय देवगण करीम लाला ही भूमिका साकारताना दिसणार आहे. मागच्या बऱ्याच काळापासून चर्चेत असलेल्या या चित्रपटाचं प्रदर्शन करोनामुळे रखडलं होतं. पण आता हा चित्रपट येत्या २५ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सीमा पहवा, विजय राज आणि हुमा कुरैशी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.