गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री आलिया भट्ट चांगलीच चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच आलियाने ती आई होणार असल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. त्यानंतर आता आलियाने ‘डार्लिंग्स’ या तिच्या आगामी सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. एटरनल सनशाईन या आलिया भट्टच्य़ा प्रोडक्शन हाऊसचा हा पहिला सिनेमा आहे.

आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘डार्लिंग्स’ सिनेमाचा टीझर शेअर केलाय. टीझरमध्ये शेफाली शहा आणि आलिया भट्ट आई मुलीच्या भूमिकेत दिसत आहेत. यात आलिया विंचू आणि बेडकाची कथा सांगताना दिसतेय. टीझर पाहता सिनेमात डार्क कॉमेडीसोबतच सस्पेंस पाहायला मिळेल हे लक्षात येतेय. सिनेमाच्या टीझरवरून आलियाच्या भूमिकेचा अंदाज घेता येत नसला तरी टीझर उत्कंठा वाढवणार आहे. सोबतच सिनेमात रोशन मॅथ्यू आणि विजय वर्मा महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

पहा टीझर

टीझरमध्ये आलिया आणि विजय वर्मा कपल असल्याचं दिसून येतयं. यात दोघांमधील प्रेम तसचं रुसवे फुगवे पाहायला मिळतायत. तर पुढे जावून काहीतरी थरारनाट्य घडणार याची कल्पना येतेय. सिनेमात शेफाली शहा आलिया भट्टच्या आईची भूमिका साकारत असल्याचं दिसून येतंय. ‘डार्लिंग्स’ सिनेमात या माय-लेकींचा सस्पेन्स पाहायला मिळणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘डार्लिंग्स’ सिनेमाची निर्मिती आलियाचं होम प्रोडक्शन एटरनल सनशाइन आणि शहारुख खान आणि गौरी खानच्या रेड चिलीज प्रोडक्शनने केली आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर पाच ऑगस्टला रिलीज होणार आहे.