बॉलिवूडचे शेहेनशाह अमिताभ बच्चन पुन्हा एकदा ‘कौन बनेगा करोडपती १४’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. गेल्या २२ वर्षांपासून अमिताभ बच्चन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. त्यांच्या सूत्रसंचालनाने या कार्यक्रमामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. ते नेहमी स्पर्धक आणि प्रेक्षकांसोबत त्यांचे अनुभव शेअर करतात. असाच एक ट्रोलिंगबद्दलचा अनुभव त्यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात सांगितला.

‘कौन बनेगा करोडपती १४’च्या दुसऱ्या भागात मुंबईतील पत्रकार समित शर्मा या स्पर्धकाशी बोलताना अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवरुन होणारे याचा अनुभव सांगितला. त्यांनी सांगितले, “जेव्हा मी ब्लॉग लिहायला सुरू केल तेव्हा सुरूवातीच्या दिवसात मला त्याबद्दल काही कल्पना नव्हती. त्यामुळे त्यांना खूप ट्रॉलल केलं जायचं. नेटकरी आपशब्दांचा वापर करायचे, ज्याने मला काहीही पोस्ट करायच्या आधी विचार करण्यास भाग पाडलं.

आणखी वाचा – “…तेव्हा माझे हात, पाय थरथरतात” अमिताभ बच्चन यांनी सांगितला ‘कौन बनेगा करोडपती’ सेटवरचा अनुभव

ते म्हणाले, “मला ब्लॉग कसा लिहायचा हे सांगण्यात आलं आणि मी ब्लॉग लिहण्यास सुरूवात केली. मला या सर्व गोंष्टींची अजिबात कल्पना नव्हती. मला फोटोवरून किंवा कॅप्शनवरून ट्रोल केलं जातं. लोक अपशब्दाचा वापर करतात. मला माहीत नव्हतं की लोक आपण पोस्ट केलेल्या फोटोवर देखील कमेंट करतात. ‘क्या समझता है अपने आप को’ अशा कमेंट मी वाचल्या आहेत. त्यामुळे काहीही पोस्ट करण्याच्या आधी मी खूप विचार करतो.

आणखी वाचा – KBC14: बिग बी अमिताभ बच्चन यांनी व्याजासह परत केले स्पर्धकाचे १० रुपये!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर स्पर्धकाने अमिताभ बच्चन हे ब्लॉगमध्ये ‘इएफ’ का वापरतात याबाबत विचारले. त्यावर ते म्हणाले, ‘इएफ’ म्हणजे ‘एक्सटेडेट फॅमिली’. यानंतर अमिताभ यांना इतक्या व्यग्र शेड्यूलमधून ब्लॉग साठी वेळ कसा काढता याबाबत विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, “माझे वाचक मला प्रेरित करतात. केबीसीमधून वेळ मिळाला की मी पुन्हा ब्लॉग लिहायला सुरुवात करणार आहे. माझे वाचक मला ब्लॉग सुरू ठेवण्यास प्रेरित करतात.