दिग्दर्शक आर बल्की आणि अमिताभ बच्चन ही जोडी आपण बऱ्याचदा एकत्र पाहिली आहे. असं म्हंटलं जातं की बल्की यांना अमिताभ यांच्याबरोबर काम करायचं होतं म्हणूनच त्यांनी ‘चीनी कम’ सारखा चित्रपट लिहिला. त्यानंतर ‘पा’ या चित्रपटातसुद्धा आपण या दोघांनी केलेली कमाल अनुभवली आहे. आता आर बल्की यांच्या ‘चुप: द रिव्हेंज ऑफ अॅन आर्टिस्ट’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी संगीत संयोजक म्हणून काम केलं आहे. त्यांच्या या गाण्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे.

आणखी वाचा : “….तेव्हा अमेरिकेचा शोधही लागला नव्हता,” आपल्या भाषणाने चियान विक्रमने वेधले लक्ष

अमिताभ बच्चन यांनी ‘चुप द रिव्हेंज ऑफ अॅन आर्टिस्ट’ चित्रपटासाठी ‘moi’ हे गाणे केले. या गाण्याच्या माध्यमातून त्यांचे संगीत संयोजकाचेही गुण समोर आले. आता नुकताच त्यांनी खुलासा केला आहे की या चित्रपटात ऐकू येणारी सगळी वाद्य त्यांनी एकट्याने वाजवली आहेत. अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट करत ही बातमी दिली.

त्यांनी लिहिलं, “मी वाद्य वाजवायला बसल्यावर जी धून माझ्या मनाला भिडेल ती धून मी वापरण्याचं ठरवलं. असं करत एकेक वाद्य वाजवत गेल्यावर वेगवेगळे स्वर आणि ताल माझ्या मनाला भिडत गेले आणि या चित्रपटाचे संगीत तयार झाले.”

हेही वाचा : बिग बी झाले आणखी एका आलिशान घराचे मालक, मुंबईत ‘या’ ठिकाणी खरेदी केली नवी मालमत्ता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याविषयी खुद्द आर. बल्की यांनीच खुलासा केला आहे. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणतात, “खरंतर ही गोष्ट जाणूबुजून घडवून आणलेली नाही. मी बच्चनजींना माझा आगामी ‘चूप’ हा चित्रपट बघण्याची विनंती केली. त्यांनी तो पाहिला आणि पाहून झाल्यावर त्यांनी मला बोलावलं आणि त्यांच्याकडच्या पियानोवर एक धून वाजवून दाखवली. हा चित्रपट पाहिल्यावर ही धून त्यांच्या मनात आली असं त्यांनी सांगितलं. ती धून माझ्या काळजाला स्पर्श करून गेली. मी त्यांना ती धून चित्रपटात वापरण्यासाठी विनंती केली आणि त्यांनी आनंदाने होकार दिला.” अमिताभ बच्चन यांनी वाजवलेली ती धून चित्रपटात वापरली जाणार असून संगीत दिग्दर्शनाची धुरा अमित त्रिवेदि, स्नेहा खानवलकर यांच्यावर आहे.