अभिनेते अमिताभ बच्चन यांचे नाव सगळ्यात जास्त संपत्ती असणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्यांच्या यादीत येते. मुंबईत त्यांची अनेक घरं आहे. तर अमिताभ वरचेवर नवीन प्रॉपर्टी विकतही घेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी मुंबईत एक आलिशान असं नवीन घर घेतलं आहे. आज अमिताभ बच्चन यांची मुंबईत सहा घरं आहेत. आता त्यांनी एका गगनचुंबी इमारतीमध्ये १२ हजार स्क्वेअर फुटांचा फ्लॅट घेतला आहे. पार्थेनॉन सोसायटीच्या 31 व्या मजल्यावर त्यांनी ही मालमत्ता खरेदी केली आहे. परंतु अमिताभ इथे राहणार नाहीत. त्यांनी गुंतवणुकीसाठी ही मालमत्ता खरेदी केली असल्याचे सांगितले जात आहे.

आणखी वाचा : अभिनेता इम्रान हाश्मीवर दगडफेक, शूटिंगनंतर घडला धक्कादायक प्रकार

अमिताभ बच्चन यांच्या मुंबईत आधीच ६ मालमत्ता आहेत. १० हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरलेल्या पहिल्या ‘जलसा’ या बंगल्यात ते त्यांच्या कुटुंबीयांसह राहतात. ‘प्रतीक्षा’ हे त्यांच्या दुसऱ्या बंगल्याचं नाव आहे. तिथे ते ‘जलसा’मध्ये राहायला येण्यापूर्वी त्यांच्या आई-वडिलांसोबत राहत होते. त्यांच्या तिसरा बंगल्याचं नाव ‘जनक’ आहे. त्या बंगल्यात त्यांचे ऑफिस आहे आणि ‘वत्स’ हा त्यांचा चौथा बंगला. तर २०१३ मध्ये त्यांनी ‘जलसा’ च्या मागे ६० कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला होता. सहावी मालमत्ता त्यांनी गेल्या वर्षीच खरेदी केली होती.

अमिताभ बच्चन यांनी गेल्या वर्षी एक आलिशान डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला होता. अभिनेत्री क्रिती सेनॉनला डुप्लेक्स अपार्टमेंट भाड्याने दिली आहे. याचे ते एका महिन्याचे १० लाख रुपये भाडे घेत आहेत. हे घर क्रितीने २ वर्षांच्या करारावर घेतले आहे. लोखंडवाला रोडवरील अटलांटिस इमारतीच्या २७व्या आणि २८व्या मजल्यावर हा डुप्लेक्स आहे.

हेही वाचा : “…म्हणून बंगल्याचं नाव ‘प्रतीक्षा’ ठेवलं,” बिग बींनी केलं गुपित उघड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अमिताभ बच्चन गेले काही महिने त्यांच्या आगामी चित्रपटांमुळे खूप चर्चेत आहेत. नुकतेच त्यांच्या ‘उंचाई’ या चित्रपटाचे पोस्टर लॉंच झाले. तर अभिनेत्री रश्मिका मंदानाबरोबर ते ‘गुडबाय’ या चित्रपटाही महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत.