जगातील सर्वात क्रूर हुकूमशहांपैकी एक असलेला इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेनची भीती इतकी होती की, महासत्ता म्हणवली जाणारी अमेरिकेही हादरायची. परंतु २००३ मध्ये, तो यूएस-यूके हल्ल्याचा सामना करू शकला नाही आणि त्याला अंडरग्राऊंड व्हावे लागले. इराकमध्ये सुरू असलेल्या संघर्षादरम्यान, भारतातील सुप्रसिद्ध लेखक आणि क्राईम रिपोर्टर एस हुसैन झैदी इराकमध्ये पोहोचले होते, परंतु बगदादमध्ये त्यांचे अपहरण करण्यात आले होते.

खरं तर, २००३ मध्ये, अमेरिका आणि ब्रिटनने इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेनवर जैविक शस्त्रे गोळा केल्याचा आरोप केला होता. हे आरोप सद्दाम हुसेनने फेटाळले. काही दिवसांनंतर, अमेरिका आणि ब्रिटनच्या संयुक्त सैन्याने इराकवर हल्ला केला आणि सद्दाम हुसेनला सत्तेवरून बेदखल केले. हा संघर्ष इतका भीषण होता की सद्दाम हुसेनला भूमिगत व्हावे लागले होते.

त्याच वर्षी मुंबईतील क्राईम रिपोर्टर एस. हुसैन या संपूर्ण प्रकरणाची रिपोर्टींग करण्यासाठी इराकमध्ये पोहोचले होते. सत्तेतून हकालपट्टी झाल्यानंतर झैदी यांना सद्दाम किंवा त्याच्या जवळच्या मित्रांशी बोलायचे होते जेणेकरून काही बातम्या बाहेर येतील. याच दरम्यान, इराकमधील बगदादमध्ये काही सशस्त्र लोकांनी झैदी यांचे अपहरण केले होते.

झैदी सांगतात की, “माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली गेली होती आणि तो मला एका अज्ञात-एकांत भागात घेऊन गेले. जेव्हा अपहरणकर्त्यांनी माझ्या डोळ्याची पट्टी उघडली तेव्हा तेथे बरेच लोक होते. एक मुंडण केलेला माणूस उंच आणि लांब केसांच्या अपहरणकर्त्यांमध्ये उभा होता. त्याने मला तुटक्या इंग्रजी आणि अरबीमध्ये विचारले, तू पाकिस्तानातून आला आहेस का? मी उत्तर दिले – नाही, मी भारताचा आहे, मी हिंदी आहे.”

झैदी म्हणाले की, “यादरम्यान मी चिंतेत असताना त्या व्यक्तीने अरबीमध्ये काहीतरी विचारले, जे मला समजले नाही. मग त्याने अरेबिक मिक्स इंग्लिश मध्ये विचारले तुला अमिषा बक्कन माहित आहे का? यावर जैदी म्हणाले की हो, मी अमिषा पटेलला ओळखते. यानंतर त्याने मला अरबी भाषेत खूप शिवीगाळ केली आणि सांगितले की तू अमिषा बक्कनला ओळखत नाहीस? त्यानंतर तो रागाने खोलीत गेला आणि लॉकरमधून एक पोस्टर काढले. ते पोस्टर अमिताभ बच्चन यांच्या ‘शक्ती’ या चित्रपटाचे होते. तेव्हा मी त्यांना ओळखतो, असे सांगितले. यानंतर त्यांनी एका कागदावर काहितरी लिहीलं आणि ते म्हणाले की जेव्हाही तो मुंबईत येईल तेव्हा मला त्यांची अमिताभ बच्चन यांच्याशी ओळख करून द्यावी लागेल! मग मीही जीव वाचवायला लगेच हो म्हटलं.”

खुद्द एस. हुसैन झैदी यांनी २०१५ च्या एका मुलाखतीत इराकमधील त्यांच्या अपहरणाची कहाणी शेअर केली होती. हुसैन झैदी यांनी त्यांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत बराच काळ मुंबईतील गुन्हेगारी जगताला कव्हर केले. यासोबतच त्यांनी माफियाराज आणि मुंबई अंडरवर्ल्डशी संबंधित अनेक मनोरंजक आणि प्रसिद्ध पुस्तकेही लिहिली आहेत.