राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आज त्यांचा ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी असण्याबरोबरच समाजसेविका आणि गायिका म्हणूनही अमृता फडणवीसांना ओळखले जाते. त्यांना कायमच त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखले जाते. नुकतंच अमृता फडणवीस यांना त्यांची लेक दीविजाने शुभेच्छा दिल्या आहेत.

अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांची मुलगी दीविजा हिने नुकतंच सोशल मीडियाद्वारे आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दीविजाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने तिच्या आईबरोबरचा एक छान फोटो पोस्ट केला आहे.
आणखी वाचा : पहिल्या भेटीत काजोलचा उल्लेख ते लग्नासाठीच्या अटी, अमृता फडणवीस-देवेंद्र फडणवीसांची ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ 

“माझी जिवलग मैत्रीण, सर्वात मजेशीर व्यक्ती आणि माझ्या आयुष्यातील सर्व गोष्टींमध्ये सहभागी असणारी माझी साथीदार म्हणजेच माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”, असे दीविजाने म्हटले आहे.

आणखी वाचा : “राजकारणात जायला हवं” म्हणत अमृता फडणवीसांनी दिले संकेत, म्हणाल्या “मोठे नुकसान…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दीविजा फडणवीसच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. अनेकांनी अमृता फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही कमेंटच्या माध्यमातून दिल्या आहेत. अमृता फडणवीस या एक बँकर असण्याशिवाय गायिका म्हणून विशेष सक्रिय आहेत. त्यांनी आतापर्यंत मराठी, हिंदी, इंग्रजी आणि पंजाबी भाषेतील गाणीही गायली आहे. त्यांच्या गाण्यांना युट्यूबवर मिलियन्समध्ये व्ह्यूज पाहायला मिळतात.