मराठीमधील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये अमृता खानविलकरचं नाव आवर्जून घेतलं जातं. अमृताने आजवर साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या. उत्तम अभिनय तसेच नृत्य कौशल्याने अमृताने प्रेक्षकांना आपलंस केलं. अमृता तिच्या कामामुळे चर्चेत असतेच. पण तिचं खासगी आयुष्य देखील कधी कोणापासून लपून राहिलेलं नाही. अमृता तिचा पती हिमांशु मल्होत्राबरोबर सुखाचा संसार करत आहे. अमृताने नवऱ्याबरोबरचा एक जुना व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला.

आणखी वाचा – VIDEO : झोप अनावर झाली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरील वनिता खरातचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

‘नच बलिए ७’ या हिंदी डान्स रिएलिटी शोमध्ये अमृता हिमांशुसह स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. या शोदरम्यान अमृताच्या खासगी आयुष्याबाबत अनेक गोष्टी समोर आल्या. त्याचबरोबरीने अमृता-हिमांशुने शोसाठी केलेली मेहनत फळाला आली. कारण अमृता-हिमांशु या सीझनची विजेता जोडी होती. अमृताने याच शोदरम्यानचा व्हिडीओ शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

पाहा व्हिडीओ

७ वर्षांपूर्वी अमृता-हिमांशुला ‘नच बलिए ७’चं विजेतेपद मिळालं होतं. अमृताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ‘नच बलिए ७’च्या मंचावर ट्रॉफी स्वीकारताना ती दिसत आहे. तसेच विजेतेपद घोषित झाल्यानंतर अमृता रडते आणि आपल्या नवऱ्याला मिठी मारते. अमृता आणि हिमांशुसाठी हा क्षण खरंच खूप महत्त्वाचा होता. या सुंदर क्षणाला ७ वर्ष पूर्ण होताच अमृताने पुन्हा एकदा हा आनंद तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला.

आणखी वाचा – Takatak 2 Teaser : ‘टकाटक २’चा सर्वात बोल्ड टीझर प्रदर्शित, बिकीनी लूकमधील अभिनेत्रीने वेधलं लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘नच बलिए ७’ हा सुरु होण्यापूर्वीच अमृता-हिमांशु विवाहबंधनात अडकले होते. या दोघांनी ‘नच बलिए ७’ या शोमध्ये उत्तमोत्तम डान्स परफॉर्मन्स केले. इतकंच नव्हे तर या सेलिब्रिटी जोडीचे डान्स आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.