Anant Ambani Radhika Merchant 2nd Pre-Wedding: पुन्हा एकदा देशातच नव्हे तर जगभरात अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंगची चर्चा सुरू आहे. इटली ते फ्रान्स असा प्रवास करत क्रूझवर होणाऱ्या या प्री-वेडिंगकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. अनंत-राधिकाचा हा दुसरा प्री-वेडिंग सोहळा चार दिवसांचा असणार आहे. आजपासून ते १ जूनपर्यंत हा सोहळा रंगणार आहे. अभिनेता सलमान खान, रणवीर सिंग, रणबीर कपूर, आलिया भट्टसह अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी इटलीला रवाना झाले आहेत. चार दिवसांच्या या सोहळ्यात विविध कार्यक्रम असून त्यासाठी ड्रेसकोड ठरवण्यात आला आहे. त्यामुळे आज आपण अनंत-राधिका दुसऱ्या प्री-वेडिंगमधील ड्रेसकोड आणि जेवणाचा मेन्यू काय आहे? जाणून घेऊयात…

अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगच्या पत्रिकेत ड्रेसकोड सांगण्यात आला आहे. आज वेलकम लंचचा कार्यक्रम असणार आहे, ज्याला नाव दिलं आहे ‘स्टेरी नाइट’. या कार्यक्रमासाठी पाहुण्यांना वेस्टर्न फॉर्मल्स ड्रेसकोड देण्यात आला आहे. म्हणजे सलमान खान ते बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी या ड्रेसकोडमध्ये पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या दिवशी ३० मेला ‘ए रोमन हॉलीडे’ नावाचा कार्यक्रम असणार आहे. या कार्यक्रमासाठी ड्रेसकोड टूरिस्ट चिक आउटफिट्स आहे. या दिवशी रात्री उशीरा एक पार्टी देखील होणार आहे.

हेही वाचा – अंबानी कुटुंबातील ‘या’ सूना पतीपेक्षा वयाने आहेत मोठ्या; होणारी सून राधिका मर्चंट ३० वर्षांची तर अनंत…

३१ मे हा अंबानी कुटुंबासाठी सर्वात खास दिवस आहे. कारण यादिवशी मुकेश अंबानींची नात वेदाचा पहिला वाढदिवस आहे. मुकेश अंबानींचा मोठा मुलगा आकाश आणि श्लोकाची मुलगी वेदा आहे. दक्षिण फ्रान्सच्या कान्समध्ये हा दिवस साजरा केला जाणार आहे. या दिवशी रणबीर आलियापासून सर्व पाहुणे ब्लॅक टाइ ड्रेसकोडमध्ये दिसणार आहेत. अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगचा शेवटचा दिवस म्हणजे १ जून इटलीत असणार आहे. या दिवशी सर्व दिग्गज पाहुणे इटालियन समर ड्रेसमध्ये पाहायला मिळणार आहेत. हा सर्व सोहळा ७५०० कोटींच्या क्रूझवर होणार आहे.

हेही वाचा – अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या दुसऱ्या प्री-वेडिंगमधला पहिला फोटो आला समोर, ओरीने दाखवली लक्झरी क्रूझची झलक

जेवणाचा मेन्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अंबानी कुटुंबाला दाक्षिणात्य आणि गुजराती भोजन आवडत असलं तरी पाहुण्यांसाठी विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ असणार आहेत. मार्चमध्ये झालेल्या प्री-वेडिंगमध्ये ज्याप्रमाणे पारशी, थाई, मॅक्सिकन आणि जपानी पदार्थांचा मेन्यू ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये जेवणाचा मेन्यू असणार असल्याचं म्हटलं जात आहे.