उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा नुकताच साखरपुडा पार पडला. आता लवकरच राधिका मर्चंट हिच्यासोबत तो विवाहबद्ध होणार आहे. त्याच्या साखरपुडाचे अनेक फोटो गेले काही दिवस सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अशाच काही फोटोंमध्ये दिसत असलेल्या त्याच्या ब्रोचची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

अनंत अंबानीचा साखरपुडा मोठ्या दिमाखात आणि राजेशाही थाटात संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी हजेरी लावली होती. बॉलिवूड कलाकार देखील या साखरपुड्याला उपस्थित होते. ज्यावेळी अनंत आणि राधिका यांच्या वेशभूषेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

आणखी वाचा : Pathaan box office collection: चौथ्या दिवशीही सर्वत्र ‘पठाण’चाच डंका, कमावला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

राधिका मर्चंटने साखरपुड्याच्या वेळी लोकप्रिय डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेला गोल्ड सिल्क टिश्यू घागरा परिधान केला होता. तर दुसरीकडे अनंत अंबानीने गडद निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. त्याच्या कुर्त्यावर परिधान केलेल्या कोटवर ‘कार्टियर पँथर ब्रोच’ लावला होता. अनंतच्या वेशभूषेपेक्षाही त्याच्या या ब्रोचची सर्वत्र चर्चा रंगली.

हेही वाचा : वजन कमी करण्यावरुन शाहरुख खानने मारलेला अंबानींच्या मुलाला टोमणा; अनंत अंबानीने दिलं ‘हे’ उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘कार्टियर पँथर ब्रोच’ हा प्लॅटिनम किंवा सोन्यापासून तयार केला जातो. याला ब्रोचला हिऱ्यांनी मडवले जाते. तर या पॅंथरचे चमकणारे डोळे पाचूचे बनवले जातात. या पँथर ब्रोचची रचना कार्टियरच्या तिसऱ्या पिढीतील जॅक कार्टियर यांनी १९१४ मध्ये केली होती. या ब्रोचची किंमत १ कोटी १३ लाख ५१ हजार ०८७ पासून १ कोटी ३२ लाख २६ हजार ०८५ पर्यंत असते. अनंत अंबानी याचा ब्रोचही कस्टमाइझ होता. परंतु अनंतने घातलेल्या ब्रोचची किंमत नक्की किती हे अजून समोर आलेलं नाही. त्याच्या ब्रोच किंमतही १ कोटी १३ लाख ते १ कोटी ३२ लाखांच्यामध्ये आहे.