अभिनेत्री अनन्या पांडेने ‘स्टुडंट ऑफ द इयर -2 ‘ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. या सिनेमासाठी अनन्याला फिल्म फेअरचा बेस्ट डेब्यू अवॉर्डही मिळाला. तसंच तिच्या अभिनयाचं कौतुकही करण्यात आलं. सध्या अनन्या वेगवेगळ्या सिनेमांच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे.

अनन्या पांडेने आजवर तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी फारसा खुलासा केलेला नाही. मात्र ‘स्टुडंट ऑफ द इयर -2 ‘ या सिनेमाच्या प्रमोशनवेळी अनन्याने तिच्या आयुष्यातील एक पहिला वहिला आणि खास अनुभव सांगितला होता. सिनेमाचं प्रमोशन करत असताना अनन्याने एका रेडिओ शोमध्ये तिच्या पहिल्या किसचा प्रसंग शेअर केला होता.

अनन्याने या शोमध्ये तिने आयुष्यात पहिल्यांदा कुणाला किस केलं हे सांगितलं. ‘स्टुडंट ऑफ द इयर -2’ या सिनेमात अनन्या आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या किसचा एक सीन आहे. टायगर श्रॉफला किस करण्याचा अनुभव कसा होता असा प्रश्न तिला रेडिओ शोमध्ये विचारण्यात आला होता. यावर ती म्हणाली, “हे माझं पहिलं किस होतं. या आधी मी कुणालाही कधीच किस केलं नाही त्यामुळे मी तुलना करू शकत नाही. हे आतापर्यंतचं बेस्ट किस होतं.” असं उत्तर अनन्याने दिलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya (@ananyapanday)

करीना कपूरने शेअर केला दुसऱ्या बाळाचा फोटो; चिमुकल्यासोबत खेळण्यात सैफ आणि तैमूर दंग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनन्या पांडे लवकरच करण जोहरच्या ‘Liger: साला क्रॉसब्रीड’ या सिनेमात झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ हे करणार असून चित्रपटाची निर्मिती करण जोहर करणार आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.