“शाहरुख माझ्या वडिलांसारखे आहेत…”, अनन्या पांडेने केलं होतं वक्तव्य

अनन्या पांडेने एका मुलाखतीत हे वक्तव्य केलं होतं.

ananya pandey, shahrukh khan,
अनन्या पांडेने एका मुलाखतीत हे वक्तव्य केलं होतं.

अभिनेता चंकी पांडे यांची लाडकी लेक अनन्या पांडे ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अनन्याचे बरेच मित्र-मैत्रिणी हे चित्रपटसृष्टीतील आहेत कारण त्यांचे कुटुंब हे आधी पासून एकमेकांना ओळखतात. तर अनन्या ही बॉलिवूडचा किंग खान शाहरुखनची लेक सुहानाची चांगली मैत्रिण आहे. बऱ्याचवेळा अनन्या ही आर्यन आणि अबरामसोबत वेळ घालवताना देखील दिसली आहे.

खरंतर अनन्या ही शाहरुखच्या कुटुंबाचा जणू काही एक भाग आहे. एवढंच नाही तर एकदा अनन्या शाहरुखला तिच्या वडिलांसारखा आहे असं म्हणाली होती. २०१९ साली ‘एशियन एज’ला दिलेल्या मुलाखतीत अनन्या तिच्या आणि शाहरुखच्या बॉन्डिंगवर बोलली होती. “शाहरुख माझ्यासाठी वडिलांसारखे आहेत. ते माझ्या सगळ्यात चांगल्या मैत्रिणीचे वडील आहेत. आम्ही एकत्र आईपीएलचे सामने पाहण्यासाठी जायचो,” असे अनन्या बोलली होती.

‘फिल्मफेअर’ला दिलेल्या एका वृत्तानुसार, ‘स्टुडंट ऑफ द इयर २’च्या प्रमोशवेळी अनन्याने शाहरुखच्या आणखी काही गोष्टी सांगितल्या. “आम्ही मैत्रिणींनी एकत्र बऱ्याच विचीत्र गोष्टी केल्या आहेत. शाहरुख सर, नेहमी आम्हाला प्रोत्साहीत करायचे आणि आमच्यासोबत फोटोशूट करायचे. ते आमचे व्हिडीओ काढायचे आणि ते व्हिडीओ दाखवत आम्ही किती चांगला अभिनय करतो याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करयाचे. त्यानंतर तो व्हिडीओ ते इतरांना दाखवायचे आणि म्हणायचे बघा या लोकांनी काय केलं आहे.”

आणखी वाचा : जात लपवण्यासाठीच वडिलांनी स्वीकारलं ‘बच्चन’आडनाव, अमिताभ यांचा खुलासा

पुढे अनन्या बोलली, “फक्त सुहाना आणि शनायाचं तिच्या चित्रपटसृष्टीतील सगळ्यात चांगल्या मैत्रिणी आहेत आणि आम्ही एकमेकांसोबत सगळ्या गोष्टी शेअर करतो.” शनाया ही अभिनेता संजय कपूरची लेक आहे. शनाया लवकरच एका चित्रपटात दिसणार आहे.

आणखी वाचा : ‘एवढं मोठ घर काय कामाचं आहे…’, हातातील कॉफी मगमुळे करीना झाली ट्रोल

दरम्यान, अनन्याने ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या व्यतिरिक्त अनन्या कार्तिक आर्यन आणि भूमि पेडणेकरसोबत ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटात दिसली होती. यानंतर अनन्या ईशान खट्टरसोबत ‘खाली पिली’ या चित्रपटात दिसली. लवकरच अनन्याचा दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडासोबत ‘Liger: साला क्रॉसब्रीड’ या चित्रपटात दिसणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ananya pandey said that shahrukh khan is my second dad dcp