अनन्या पांडेने व्यक्त केली या अभिनेत्यासोबत काम करण्याची इच्छा

एका मुलाखती दरम्यान तिने ही इच्छा व्यक्त केली आहे

अनन्या पांडे
बॉलिवूड दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता करण जोहरच्या ‘स्टूडंट ऑफ द इअर २’ या चित्रपटातून अभिनेत्री अनन्या पांडेने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटानंतर अनन्याचे संपूर्ण आयुष्य बदलले असले तरी ती एका सामान्य तरुणीप्रमाणे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत असल्याचे अनन्याने सांगितले आहे. दरम्यान अनन्याने तिची एक इच्छा व्यक्त केली आहे.

२० वर्षांच्या अनन्याने आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिला सामन्य मुलीप्रमाणे वागायला आवडते आणि तसे वागण्याचा प्रयत्न ती करत असल्याचे तिने सांगितले आहे. ‘स्टूडंट ऑफ द इयर २ चित्रपटानंतर माझे आयुष्य बदलले आहे. लोक मला ओळखू लागले आहेत. पण मी एक सामान्य मूली प्रमाणे वागण्याचा प्रयत्न करते’ असे अनन्या म्हणाली. अनन्या लोकप्रिय अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. ‘एका अभिनेत्याच्या घरात जन्माला येणे माझे भाग्यच आहे. मी स्टार किड असल्यामुळे बॉलिवूडमध्ये एण्ट्री करणे माझ्यासाठी सोपे होते’ असे अनन्या पुढे म्हणाली.

‘मी अशा ऑफरची वाट पाहत आहे ज्यामध्ये मला माझ्या वडिलांसोबत काम करण्याची संधी मिळेल. माझी माझ्या वडिलांसोबत काम करण्याची इच्छा आहे. मी आशा करते की एखादा चित्रपट निर्माता आम्हाला अशी ऑफर लवकरच देईल. कोणी ऐकत असेल तर तुम्हाला विनंती आहे आम्हाला एकत्र काम करण्याची संधी द्या’ असे अनन्या म्हणाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ananya pandey wish to work with his father avb

ताज्या बातम्या