७७ वा ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ भारतासाठी खूप खास राहिला. श्याम बेनेगल यांच्या ‘मंथन’ला रिलीजच्या जवळपास ४८ वर्षांनंतर या फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्पेशल स्क्रिनिंग मिळालं. यंदाच्या सोहळ्यात अनेक भारतीय सिनेसृष्टीतील कलाकार, एन्फ्लूएन्सर व उद्योजकांनी हजेरी लावली. भारतीय चित्रपट आणि कलाकारांना या महोत्सवात अनेक श्रेणींमध्ये नामांकन मिळालं होतं. त्यातच आता एका भारतीय अभिनेत्रीने ‘कान’ मध्ये पुरस्कार मिळवला आहे.

अनसूया सेनगुप्ता असं या अभिनेत्रीचं नाव आहे. ती पश्चिम बंगालमधील कोलकाताची आहे. तिने ‘द शेमलेस’मधील तिच्या अभिनयासाठी अन सर्टन रिगार्ड प्राइज सेगमेंटमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला. बल्गेरियन चित्रपट निर्माते कॉन्स्टँटिन बोजानोव यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि लिहिलेल्या या चित्रपटात अनसूयाने रेणुका नावाची भूमिका केली होती. तिचं पात्र एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या केल्यानंतर दिल्लीच्या वेश्यागृहातून पळून जाते. या चित्रपटात ओमरा शेट्टी ही महत्वाच्या भूमिकेत आहे. अनसूया हा पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे.

“बहुतांश मराठी अभिनेत्रींमध्ये ‘गांधी-आंबेडकर’ यांच्याविषयी बोलताना कुत्सित…”, जान्हवी कपूरचा व्हिडीओ शेअर करत किरण मानेंचं वक्तव्य

अनसूयाने तिचा पुरस्कार जगभरातील समलैंगिक समुदायाच्या शौर्याला समर्पित केला आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भाषणात ती म्हणाली, “सर्वांच्या समानतेसाठी लढणासाठी तुम्ही समलिंगी असण्याची गरज नाही. आपण फक्त सभ्य माणूस असायला हवं.”

पतीचे विवाहबाह्य संबंध? वर्षभरापूर्वी दुसरं लग्न करणाऱ्या अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत; म्हणाली, “मुलांसाठी गप्प…”

अनसूया सेनगुप्ता मूळची कोलकाताची आहे. तिने मुंबईत प्रॉडक्शन डिझायनर म्हणून काम केलं आहे. ती सध्या गोव्यात राहते. ‘मसाबा मसाबा’ या नेटफ्लिक्स शोचा सेट तिने डिझाइन केला होता. अनसूयाने जाधवपूर विद्यापीठातून शिक्षण घेतलं आहे. याआधी ‘द कोलकाता’ला दिलेल्या मुलाखतीत अनसूया म्हणाली होती, “कान्समध्ये आमच्या चित्रपटाला नॉमिनेशन मिळाल्याचं कळाल्यावर मी आनंदाने खुर्चीवरून उडी मारली होती!”