युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे दोन्ही देशांमध्ये अजूनही परिस्थिती बिकट आहे. या युद्धात युक्रेनी सैनिकांना लक्ष्य केलं जात असून सामान्य नागरिकांना कोणताही धोका नसल्याचं रशियाकडून सांगण्यात येत आहे. असं असलं तरी युक्रेनचे सैनिक मोठ्या धैर्याने रशियाच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत आहेत. तर युक्रेनच्या नागरिकांनीही रशियन सैन्याला रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. आता याच दरम्यान हॉलिवूड स्टार अँजेलिना जोलीने युद्धस्थळी भेट देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. नुकतीच युक्रेनमधील ल्विव्ह येथील एका कॅफेमध्ये अँजेलिना दिसली होती. याशिवाय अँजेलिनाने तिथल्या मुलांची भेट घेतली आहे. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अँजेलिनाच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ती युक्रेनच्या वैद्यकीय स्वयंसेवकांची भेट घेत असल्याचे दिसत आहे. यादरम्यान अँजेलिनाने डोनेस्तक प्रदेशातून बाहेर काढण्यात आलेल्या अनाथ आणि जखमी मुलांचीही भेट घेतली. त्यानंतर अँजेलिनाचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत अँजेलिना एका कॅफेमध्ये असल्याचे दिसत आहे. तर तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने तिचा व्हिडीओ काढला आहे. त्यावेळी तिथे बसलेला एक लहान मुलगा मात्र त्याच्या फोनमध्ये गुंग असल्याचे पाहायला मिळते.

आणखी वाचा : आई कुठे काय करते : यशला सोडून गौरी अमेरिकेला जाणार का?

आणखी वाचा : ‘धर्मवीर’ चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका साकारणारा अभिनेता, कोण आहे माहितीये का?

तर कॅफेमध्ये अॅंजेलिनाला पाहून लोक हैराण झाले आहेत. याआधी अॅंजेलिनाने रोममधील एका रूग्णालयालाही भेट दिली, जिथे डझनभर निर्वासित मुले आहेत. यावेळी त्यांनी युक्रेनबद्दल चिंता आणि पाठिंबा व्यक्त केला. अँजलिनाने UNHCR साठी तिच्या कामाचा एक भाग म्हणून युद्ध क्षेत्राला समर्थनाथ भेट दिली.

आणखी वाचा : प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा ते अक्षय कुमार…, सेलिब्रिटी ‘या’ साइड बिझनेसमधून कमावतात कोट्यावधी रुपये

आणखी वाचा : अथिया – केएल राहुल होणार आलिया आणि रणबीरचे शेजारी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अँजेलिना जोली (UNHCR) युनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर रिफ्युजीशी संबंधित आहे. अँजेलिना जोली जवळजवळ दोन दशकांपासून संयुक्त राष्ट्राशी संबंधीत आहे. निर्वासित आणि लोकांच्या भल्यासाठी काम करते. याआधी मार्चमध्ये येमेन यादवी युद्धादरम्यान निर्वासितांना मदत देण्यासाठी अँजेलिनाने या देशालाही भेट दिली होती.