बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांची धाकटी लेक आणि निर्माती रिया कपूरने लग्न केले आहे. रियाने बॉयफ्रेंड करण बूलाणीसोबत लग्न गाठ बांधली आहे. दोघांनी १४ ऑगस्ट रोजी कुटुंब आणि जवळच्या काही मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. रियाच्या लग्नात बॉलिवूडमधील जास्त कलाकारांना आमंत्रण दिले नव्हते, म्हणून आता अनिल कपूर त्यांच्या मुलीसाठी रिसेप्शन पार्टीचे आयोजन करणार आहे. मात्र, कपूर कुटुंबाकडून याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

‘पिंकव्हिला’ने दिलेल्या वृत्तानुसार, आज अनिल कपूर रियाच्या रिसेप्शनसाठी डिनर पार्टीचे आयोजन करू शकतात. त्यांची इच्छा होती की लग्न हे अगदी साध्या पद्धतीने झालं पाहिजे. त्यात करोनामुळे त्यांनी आणखी कमी लोकांना लग्नाला बोलावलं होतं. रियाच्या लग्नात अनिल कपूर यांचे भाऊ बोनी कपूर, संजय कपूर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं.

rhea kapoor, rhea kapoor marriage,
मसाबाने रियाच्या लग्नात हजेरी लावली होती.

आणखी वाचा : आगळा वेगळा विवाहसोहळा! असे झाले अनिल कपूर यांच्या मुलीचे लग्न

रियाच्या लग्नात बॉलिवूडमधील लोकप्रिय फॅशल डिझायनर मसाबा गुप्ताने हजेरी लावली होती. यावेळी मसाबाने रियाच्या पायांचा एक फोटो देखील शेअर केला होता. या फोटोवरून रिया आणि मसाबा खूप चांगल्या मैत्रिणी असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

आणखी वाचा : करीनासोबत लग्नाच्या दिवशी सैफने पूर्वाश्रमीची पत्नी अमृताला लिहिले होते पत्र!

रिया आणि करण एकमेकांना गेल्या ११ वर्षांपासून ओळखत आहेत. आधी मैत्री आणि मग प्रेम अशी काही त्यांची लव्हस्टोरी आहे. दरम्यान, रिया आणि करण दोघांनाही साध्या पद्धतीने लग्न करायचे होते.