Ankita Lokhande And Vicky Jain Expecting First Baby? : अंकिता लोखंडे हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. अभिनेत्री कुठल्या ना कुठल्या कारणामुळे नेहमी चर्चेत असते. अंकिता सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती व तिचा नवरा विकी जैन अनेकदा सोशल मीडियामार्फत एकमेकांबरोबरचे, तसेच कुटुंबीयांबरोबरचे फोटो व व्हिडीओ पोस्ट करीत असतात. अशातच अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केली आहे.

अंकिता लोखंडे निर्माता संदीप सिंगच्या खूप जवळची आहे. अलीकडेच तिने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर त्याचे (संदीप) आणि तिचा पती विकी यांच्याबरोबरचे काही फोटो शेअर केले. अंकिताने या पोस्टमध्ये होणाऱ्या बाळाचा उल्लेख केला, ज्याने तिच्या चाहत्यांचे लक्ष लगेच वेधून घेतले. अंकिताने संदीपला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

अंकिता लोखंडेची पोस्ट

अंकिताने संदीप तिला कसा भेटला ते सांगितले. तसेच संदीपने अंकिता, तिचा पती आणि अगदी त्यांचे होणारे बाळ यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली, जी तिला खूप भावली. तिने लिहिले, “संदीप तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! देव तुला नेहमीच आशीर्वाद देवो. मी फोन करण्याचा प्रयत्न केला; पण नेहमीप्रमाणे तुझा फोन लागला नाही. तरीही, मी तुला सांगू इच्छिते की, तू नेहमीच माझ्याबरोबर आहेस याबद्दल मी आभारी आहे. तू अदभुत आहेस आणि काल तू ज्या पद्धतीने आलास, खूप काळजी दाखवलीस आणि माझ्यासाठी, विकीसाठी आणि आमच्या होणाऱ्या बाळासाठी तू खूप काही केलेस, ते मला खरोखरच भावले.”

अंकिता पुढे म्हणाली की, त्यांचे नाते आणखी मजबूत होत जाईल आणि ते तिघेही एकत्र राहतील. तिने त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे कौतुक केले आणि त्याला शुभेच्छा दिल्या. तिने लिहिले, “मला खरोखर तुझी काळजी आहे आणि तू आमच्या आयुष्यात आहेस याबद्दल मी आभारी आहे. मला आनंद आहे की, विकी तुझी कदर करतो. तसेच तो तुला समजून घेतो. माझा मित्र माझ्या पतीच्याही इतक्या जवळ आहे याचा मला खूप आनंद आहे. मला खरोखरच असे वाटते की, हे नाते काळानुसार अधिक मजबूत व्हावे आणि आपण तिघेही एकत्र उभे राहू शकू.”

पोस्ट व्हायरल होताच, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडला. एका नेटकऱ्याने लिहिले, “तुम्ही गर्भवती आहात का?” दुसऱ्याने कमेंट केली, “तुम्ही दोघे लवकरच आई-बाबा होणार आहात का? व्वा, अभिनंदन!” तर अनेकांनी फक्त कमेंट केली, “अंकिता लोखंडे गर्भवती आहे का?”