अभिनेत्री अनु अग्रवालने ३५ वर्षांपूर्वी १९९० मध्ये महेश भट्ट यांच्या ब्लॉकबस्टर म्युझिकल रोमान्स चित्रपट ‘आशिकी’मधून पदार्पण केले आणि ती प्रत्येक घरात प्रसिद्ध झाली. इतक्या वर्षांनंतरही अभिनेत्रीने असा दावा केला आहे की, तिला अद्याप त्या चित्रपटाचे पूर्ण मानधन मिळालेले नाही. या चित्रपटाची सह-निर्मिती दिवंगत गुलशन कुमार यांच्या टी-सीरिजने केली होती. हे महेश भट्ट व मुकेश भट्ट यांच्या ‘स्पेशल फिल्म्स’च्या बॅनरखाली बनविण्यात आले होते.

‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीत अनु अग्रवालने ‘आशिकी’ चित्रपटाबद्दल सांगितले. ती म्हणाली, “मला आजपर्यंत ‘आशिकी’चे पूर्ण मानधन मिळालेले नाही. मला एकूण शुल्काच्या फक्त ६0 टक्के रक्कम देण्यात आली. त्यांना अजूनही माझे ४० टक्के द्यायचे बाकी आहेत.” ती पुढे म्हणाली, “काही हरकत नाही; मी खूप कमाई केली. मी मॉडेलिंगमधून खूप कमाई केली. मी ब्रँड अ‍ॅम्बेसॅडर झाले.”

अभिनेत्री अनु अग्रवालनेही असा दावा केला की, ती ब्रँड अ‍ॅम्बेसॅडर बनणारी पहिली अभिनेत्री होती. अनु अग्रवाल म्हणाली, “त्या वेळी ब्रँड अ‍ॅम्बेसॅडर म्हणून कोणीही पुरुष अभिनेता नव्हता. त्या वेळी फक्त क्रिकेट दिग्गजच ब्रँड अ‍ॅम्बेसॅडर होते, जसे की सुनील गावसकर आणि इतर. चित्रपटाचे पूर्ण पैसे न मिळाल्यावर ती म्हणाली, “ठीक आहे. ही माझ्याकडून त्यांना भेट आहे”.

अनु अग्रवालनकडून दाऊद इब्राहिमचा उल्लेख

त्या काळी इंडस्ट्रीत दाऊद इब्राहिमसारख्या लोकांचं राज्य असायचं. इंडस्ट्रीत येणारा सगळा पैसा अंडरवर्ल्डमधून यायचा. मला आजपर्यंत ‘आशिकी’चे सगळे पैसे मिळालेले नाहीत. मानधनाच्या फक्त ६० टक्के रक्कम मला मिळाली; बाकी ४० टक्के अजूनही त्यांनी मला देणं आहे, असं ती म्हणाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आशिकी’ या चित्रपटानंतर अनु अग्रवाल बॉलीवूडमधील अत्यंत प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्री होईल, असं अनेकांना वाटलं होतं. मात्र दुर्दैवाने 1999 मध्ये तिचा एक भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की त्यानंतर ती कोमात गेली आणि अनेक महिने तिला काही गोष्टी आठवतही नव्हत्या. या अपघाताच्या अनुच्या करिअरवर मोठा परिणाम झाला आणि ती चित्रपटसृष्टीपासून दूर गेली.