दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. लवकरच ती ‘रावडी बॉइज’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर यात लिपलॉक किस करताना दिसल्यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. या चित्रपटात अनुपमानं पहिल्यांदाच किसिंग सीन दिला आहे. सध्या सोशल मीडियावर याचीच सर्वाधिक चर्चा सुरू असलेली दिसत आहे.

अनुपमा परमेश्वरनने ‘रावडी बॉइज’ या चित्रपटात अभिनेता आशिष रेड्डीसोबत किसिंग सीन दिला आहे. आशिष या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. पण अनुपमाच्या चाहत्यांना मात्र तिचा हा अंदाज अजिबात आवडलेला नाही. अनेकांनी या सीनमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे.

अनुपमाच्या ‘रावडी बॉइज’ चित्रपटाबद्दल बोलायचं तर या चित्रपटाची कथा कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर आधारित आहे. अनुपमा आणि आशिष कॉलेजमध्ये एकमेकांना भेटतात आणि एकमेकांच्या प्रेमात पडतात. एकंदर ट्रेलरमध्ये या दोघांची सिझलिंग केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. चित्रपटात अॅक्शन आणि रोमान्सचं परफेक्ट कॉम्बिनेशन असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अनुपमा परमेश्वरन तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. काही काळापूर्वीच तिचं नाव भारतीय क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहशी जोडलं गेलं होतं. अर्थात यात काहीच तथ्य नव्हतं. जसप्रीतनं त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्नाची घोषणा केल्यानंतर या चर्चा बंद झाल्या. पण आजही अनेकजण अनुपमाला जसप्रीतची कथित गर्लफ्रेंड म्हणूनच ओळखतात. याशिवाय आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळेही अनुपमा अनेकदा चर्चेचा विषय ठरते.