अर्चना पूरण सिंह आणि परमित सेठी यांच्या कुटुंबाने बऱ्याच काळापासून व्लॉगिंगद्वारे चाहत्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनाची झलक दाखवली आहे. त्यांच्या नवीनतम व्लॉगमध्ये अर्चना पूरण सिंह आणि परमित सेठी यांनी त्यांच्या मढ आयलंड बंगल्याबद्दल चर्चा केली. त्यांना तो काळ आठवला जेव्हा त्यांच्याकडे मालमत्ता खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते आणि त्यांनी ही कल्पना सोडून दिली होती.

व्हिडीओमध्ये अर्चना पूरण सिंह म्हणाल्या, “जेव्हा आम्ही ते घर पाहिले तेव्हा ते खूप महाग होते. मग आम्ही थोडा वेळ वाट पाहिली. आम्ही ते विसरून गेलो. मग मालमत्तेच्या किमती कमी झाल्या आणि मी सांगितले की, आपल्याला ते खरेदी करायचे आहे. परमितने विचारले की, आपल्याला बंगला का खरेदी करायचा आहे. त्याबद्दल बरीच चर्चा झाली. मग मी म्हणाले की, आपण दोन बंगले खरेदी करू.”

आपला घटस्फोट होईल : परमित सेठी

अर्चना यांनी सांगितले की, जेव्हा त्यांनी दोन बंगले खरेदी करण्याची चर्चा केली तेव्हा परमितने त्यांना सांगितले होते, “आपला घटस्फोट होईल. एक बंगला पुरेसा आहे. तो कसा सांभाळायचा?” अर्चना यांनी स्पष्ट केले की, परमित एका अपार्टमेंटचा मालक आहे; पण मग दोघांनीही कसेतरी बंगले खरेदी केले. त्यांनी स्पष्ट केले की, जेव्हा ते या घरात राहायला आले तेव्हा त्यांची मुले लहान होती आणि ती बोटीने शाळेत जात असत, ज्यामुळे त्यांच्या शिक्षकांनाही आश्चर्य वाटायचे.

अर्चना पूरण सिंह त्यांचे पती परमित सेठी आणि त्यांच्या मुलांसह मढ आयलंडवरील एका बंगल्यात राहतात. आर्यमन आता त्याची गर्लफ्रेंड योगिताबरोबर घराच्या दुसऱ्या भागात राहणार आहे आणि त्या भागात आता काम सुरू आहे.

‘स्क्रीन’ला दिलेल्या अलीकडच्या मुलाखतीत, परमितने आर्यमन व योगिता यांच्या साखरपुड्याबद्दल आणि एकत्र राहण्याच्या त्यांच्या निर्णयाबद्दल उघडपणे सांगितले. तो म्हणाला, “आम्ही त्याचा पूर्णपणे आदर करतो. आम्ही असे रूढीवादी पालक नाही आहोत, जे त्यावर आक्षेप घेतील. आम्हाला माहीत नाही की काय होईल आणि केव्हा होईल; परंतु ते लवकर होणार नाही. लग्नासाठी अजूनही वेळ आहे.”