सेलिब्रिटींनी किंवा प्रसिद्ध व्यक्तींनी कसे वागावे अथवा वागू नये याच्या काही अपेक्षा सर्वसामान्यांच्या असतात. त्यांनी नेहमीच शिष्ठाचाराने वागावे असे सामान्यांना वाटत असते. त्यानुसार अनेक सेलिब्रिटी वागतातही पण काही वेळा त्यांनी तो शिष्ठाचार पाळला नाही तर मात्र ते सोशल मीडियावर ट्रोल होतात. बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग सध्या अशाच काहीशा कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे. एका लाइव्ह शोदरम्यान अरिजीत गाणं गाताना मध्येच रागाच्या भरात शिवीगाळ करताना दिसतो. गाणं गात असताना माइकची सेटिंग त्याला बरोबर वाटत नव्हती. म्हणून संयोजकांना त्याने शिवीगाळ करत माइक नीट बसवा असे सांगितले. अरिजीतचा हा व्हायरल होणारा व्हिडिओ फार जुना आहे.

व्हिडिओमध्ये अरिजीत रॉकस्टार सिनेमातली ‘नादान परिंदे’ हे गाणं गाताना दिसत आहे. पण माइक नीट बसवला नसल्यामुळे त्याला गाणं नीट गाता येत नव्हतं. यामुळेच तो वैतागला आणि त्याने शिवीगाळ केली. त्याच्या तोंडी आलेल्या शिव्यांमुळेच तो सध्या ट्रोल होत आहे. ट्विटरवर एका युझरने लिहिले की, ‘अरिजीत मोहित चौहानसारखा गाण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्याला स्वतःलाच माहित नाही की तो कसा गात आहे.’ तर दुसऱ्या युझरने लिहिले की, ‘ज्या माइकला तू शिवीगाळ करत आहे. त्याच माइकच्या सहाय्याने तो लाखो लोकांपर्यंत पोहचू शकत आहे. त्यामुळे आपण कोणत्या गोष्टीला शिव्या देतो याचे भान त्याने ठेवायला हवे.’

याआधीही ‘सुलतान’ सिनेमातील एका गाण्यावरून सलमान आणि त्याच्यात वाद झाला होता. सलमान- अरिजीतच्या या वादानेनंतर रौद्ररुप घेतलं होतं. थोड्या दिवसांनी आपली चूक लक्षात आल्यावर अरिजीतने सलमानची माफी मागितली होती.

https://twitter.com/floweraldehyde/status/953654115409776640

https://twitter.com/sumitreviews/status/953645005867974658