Kareena Kapoor Arjun Rampal Intimate Scene : अर्जुन रामपाल आणि करीना कपूर खान यांनी ‘वी आर फॅमिली’, ‘सत्याग्रह’, ‘हिरोईन’, ‘रावण’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

‘हिरोईन’ या चित्रपटात अर्जुन आणि करीनाचे खूप इंटिमेट सीन्स होते, ज्याबद्दल अर्जुनने एका मुलाखतीत असे काही म्हटले होते, ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अर्जुनने सांगितले होते की, त्याने करीनाबरोबरचे इंटिमेट सीन्स खूप एन्जॉय केले. आता त्याच्या विधानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जे ऐकून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत.

अर्जुनने काय म्हणाला होता?

खरं तर, ‘रेडिट’वर त्याची एक मुलाखत व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अर्जुनने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, ‘बेबोबरोबर कोजी होयला मला खूप मजा आली. तिच्याबरोबर घालवलेले प्रेमाचे क्षण मला अजूनही आठवतात.’

‘हिरोईन’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये करीनाव्यतिरिक्त अर्जुन, रणदीप हुडा, मुग्धा गोडसे व दिव्या दत्तादेखील होते. करीनाने नुकतीच इंडस्ट्रीमध्ये २५ वर्षे पूर्ण केली आहेत आणि तिने तिच्या कारकिर्दीत खूप कमी इंटिमेट सीन्स दिले आहेत.

अर्जुनच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, तो शेवटचा २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘क्रॅक’ चित्रपटात दिसला होता. आता तो ‘निकिता रॉय’ आणि ‘धुरंधर’ या चित्रपटात दिसणार आहे. ‘निकिता रॉय’मध्ये सोनाक्षी सिन्हा, परेश रावल मुख्य भूमिकेत होते. अर्जुनव्यतिरिक्त, धुरंधरमध्ये रणवीर सिंह, संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन यांच्याही भूमिका आहेत.

करीना कपूर बॉलीवूडची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे आणि तिचे सौंदर्य व अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतात. तिने आजवर अनेक चित्रपटांत विविध भूमिका साकारल्या आहेत. २००० साली ‘रिफ्युजी’ या चित्रपटातून करीना कपूरने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात तिच्याबरोबर अभिनेता अभिषेक बच्चन दिसला होता. करीनासह अभिषेकचा हा पहिलाच चित्रपट होता. दोघांचाही पहिलाच चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकण्यात अपयशी ठरला.

करीना कपूर शेवटची अभिनेत्री म्हणून ‘सिंघम अगेन’मध्ये दिसली होती. जर आपण तिच्या पुढच्या चित्रपटाकडे पाहिले, तर त्याचे नाव ‘दायरा’ आहे, ज्यामध्ये ती साऊथ सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारनबरोबर दिसणार आहे. हा चित्रपट मेघना गुलजार दिग्दर्शित करत आहे, ज्यांनी ‘राजी’ आणि ‘नीरजा’सारखे उत्तम चित्रपट बनवले आहेत.