अभिनेत्री स्वरा भास्करचा बिनधास्त अंदाज अनेकदा तिच्याच अंगलट येत असतो. स्वरा भास्कर सध्या सोशल मीडियावर ट्रोलर्सचा निशाण्यावर आली आहे. अफगाणिस्तानमधल्या परिस्थितीवर तिने आपलं मत मांडलं होतं. पण तिचं हे मत नेटकऱ्यांना आवडलं नाही आणि ती सोशल मीडियावर ट्रोल झाली. ट्वीटरवर सध्या #ArrestSwaraBhasker हा ट्रेंड व्हायरल होतं आहे. पाहूया काय आहे हे नेमकं प्रकरण.

स्वरा भास्करने अफगाणिस्तानमधील परिस्थितीबद्दल आपलं मत व्यक्त करण्यासाठी एक ट्विट शेअर केलंय. यात तिने अफगाणिस्तानमधील परिस्स्थितीची तुलना भारतासोबत केली आहे. यात तिने लिहिलंय, “हिंदू दहशतवादाविषयी शांत राहून तालिबानी दहशतवादाचा मात्र धक्का बसणे असं आपण करू शकत नाही… त्याचवेळी तालिबानी दहशतवादाबाबत शांत राहून हिंदू दहशतवादाविषयी नाराजी वा संताप व्यक्त करणं हेही आपण करू शकत नाही. आपली मानवतावादी किंवा नैतिक मूल्य ही अत्याचार करणारा किंवा अत्याचार होणारा कोण आहे यावर अवलंबून असू नयेत.”

स्वरा भास्करच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावरील नेटकरी मंडळी नाराज झालीय. तिच्या या ट्विटवरून नेटकऱ्यांनी तिला पुन्हा एकदा ट्रोल करण्यास सुरूवात केलीय. तिला अटक करण्याची मागणी देखील सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे. नेटकऱ्यांनी तिच्या या ट्विटवर रिप्लाय करत आपला राग व्यक्त करण्यास सुरूवात केलीय. “स्वरा भास्करने आमच्या भावना दुखावल्या आहेत, तिला अटक करा”, अशी मागणीच एका युजरने कमेंट करत केलीय. तर काही यजुर्सनी तर तिला अफगाणीस्तानला पाठवा असा सल्ला देखील दिलाय.

यासाठी सोशल मीडियावर हॅशटॅगही ट्रेंड करायला सुरूवात केली आहे.#ArrestSwaraBhaskar हा ट्रेंड सध्या ट्विटरवर व्हायरल होतोय. आहे. याआधीही अनेकदा स्वरा भास्कर तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत आल्याचं पाहायला मिळालं होतं.