बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई अनंतात विलीन झाले आहेत. कर्जतमधील एनडी स्टुडिओमध्ये त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी त्यांचे कुटुंबीय मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि स्थानिक उपस्थित होते. स्टुडिओमध्येच अंत्यसंस्कार करण्यात यावे, अशी इच्छा नितीन देसाई यांनी व्यक्त केली होती. त्याप्रमाणे त्यांना तिथेच अखेरचा निरोप देण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोठी बातमी! नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात ५ जणांविरोधात पहिला गुन्हा दाखल

नितीन देसाई यांच्या पार्थिवाला त्यांच्या मुलीने खांदा दिला, हे दृश्य पाहून उपस्थिताना अश्रू अनावर झाले. नितीन देसाईंच्या अंत्यदर्शनासाठी बॉलीवूड अभिनेता आमिर खान, मधुर भांडारकर, दिग्दर्शक रवी जाधव, मराठी अभिनेता सुबोध भावे, अभिनेत्री मानसी नाईक आले होते. कर्जतमधील एनडी स्टुडिओत नितीन देसाईंवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नितीन देसाईंचे पार्थिव पाहून कुटुंबीयांना अश्रू अनावर, पत्नी व मुलीचे फोटो आले समोर

दरम्यान, नितीन देसाई यांनी २ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. गळफास लावून त्यांनी जीवन संपवलं. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन मुंबईतील जेजे रुग्णालयात झाले. नितीन देसाई यांची मुलं परदेशात असल्याने ते आल्यावर अंत्यसंस्कार होतील अशी माहिती पोलिसांनी दिली होती. त्यानुसार आज सायंकाळी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

Video: आमिर खानने घेतले नितीन देसाईंच्या पार्थिवाचे दर्शन; शेवटच्या भेटीची आठवण सांगत म्हणाला, “त्यांच्या मुलीच्या लग्नाआधी…”

नितीन देसाईंच्या आत्महत्याप्रकरणात पहिला गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या पत्नी नेहा देसाई यांच्या तक्रारीवरून खालापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कर्ज प्रकरणात वारंवार तगादा लावून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ईसीएल फायनान्स कंपनी व एडलवाईस ग्रुपचे पदाधिकारी अशा एकूण ५ जणांविरोधात कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Art director nitin desai last rites performed at nd desai studio karjat family friends emotional hrc
First published on: 04-08-2023 at 19:39 IST