मुंबई ड्रग्ज प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान तब्बल २६ दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर आला आहे. न्यायालयातून जामीन मिळूनही कारागृह प्रशासनापर्यंत कागदपत्रे वेळेत न पोहोचल्याने आर्यन खानला आणखी एक रात्र मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात काढावी लागली. मात्र, शनिवारी तो तुरुंगातून बाहेर आला. जेलमध्ये इतके दिवस जेलमध्ये राहिल्यानंतर आर्यन खानवर शाररिक आणि मानसिकरित्या परिणाम झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या काळात आर्यनला या सर्व धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी, त्याला सावरण्यासाठी काही नियम आणि बंधन लागू केली जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पुढील काही महिने आर्यनसाठी तीन कठोर नियम तयार करण्यात आले असून त्याला त्याचे पालन करावे लागणार आहे.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात २ ऑक्टोबरपासून एनसीबीच्या ताब्यात होता. त्यानंतर ८ ऑक्टोबरला त्याची रवानगी आर्थररोड जेलमध्ये करण्यात आली. तब्बल २६ दिवस आर्यन खान तुरुंगात होता. शुक्रवारी जामीन मंजूर झाल्यानंतर अखेर काल त्याची सुटका करण्यात आली. तुरुंगातून सुटका होताच आर्यन ‘मन्नत’वर पोहोचला. यावेळी खान कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. मात्र आता पुढील काही महिने आर्यनला कठोर नियमांचे पालन करावे लागणार आहे.

बॉलिवूड लाईफ या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, शाहरुख-गौरी हे यापुढे आपल्या मुलाला मीडिया कव्हरेजपासून वाचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच गेल्या काही आठवड्यात प्रसारमाध्यमात ज्या काही गोष्टी प्रसिद्ध झाल्या आहेत, त्यापासून त्याला पूर्ण दूर ठेवले जाणार आहे.

त्यानंतर आर्यनसाठी दुसरा नियम म्हणजे पुढील काही महिने त्याच्यावर नजर ठेवली जाणार आहे. आर्यन कोणत्या मित्रांसोबत वावरतो, फिरतो, कुठे जातो, काय करतो या सर्व गोष्टींवर शाहरुख आणि गौरीची करडी नजर असणार आहे. एवढंच नाही तर तो सोशल मीडियावर किंवा फोनवरुन कोणाशी संपर्क साधतो, यावरही बारीक नजर ठेवली जाणार आहे. तर तिसरा आणि शेवटचा नियम म्हणजे शाहरुख आणि गौरी पुढील काही काळासाठी त्याला सार्वजनिक कार्यक्रम, लाईमलाईटपासून दूर ठेवणार आहे. त्यामुळे तो जास्तीत जास्त वेळ घरातच राहण्याची शक्यता आहे.

Video : आर्यन खानला पाहण्यासाठी मन्नतवर चाहत्यांची तुफान गर्दी

दरम्यान, गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानचा जामीन मंजूर केला होता. शाहरुखची मैत्रीण आणि अभिनेत्री जुही चावला शुक्रवारी संध्याकाळी २३ वर्षीय आर्यनच्या जामिनासाठी ड्रग्जशी संबंधित खटल्याची सुनावणी करणाऱ्या विशेष एनडीपीएस कोर्टात हजर झाली. हायकोर्टाने शुक्रवारी आपल्या आदेशाचा मुख्य भाग उपलब्ध करून दिला ज्यामध्ये आर्यन खान आणि या प्रकरणातील सहआरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यावर १४ अटी घालण्यात आल्या आहेत. तिघांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या जामीनदारावर आणि तत्सम रकमेच्या दोन जामिनावर सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.