जेम्स कॅमरून यांच्या ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. २००९ साली आलेल्या ‘अवतार’ने सर्वाधिक कमाईचा इतिहास रचला होता. एक अद्भुत विश्व या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळालं होतं. आज तब्बल १२ वर्षांनी या चित्रपटाचा दूसरा भाग येत आहे तरी प्रेक्षक यासाठी अजूनही प्रचंड उत्सुक आहेत.

गेल्याच महिन्यात २००९ साली आलेला ‘अवतार’ चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित केला होता आणि या चित्रपटाने पुन्हा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई केली. जेव्हा या दुसऱ्या भागाचा पहिला ट्रेलर आला होता तेव्हा तर त्यात एकही संवाद नव्हता तरी तो ट्रेलर प्रेक्षकांना आवडला होता. त्यातले व्हिज्यूअल्स, स्पेशल इफेक्ट हे खरंच डोळ्यांचं पारणं फेडणारे होते. आता याच दुसऱ्या भागाचा आणखी एक ट्रेलर नुकताचा प्रदर्शित करण्यात आला आहे.

आणखी वाचा : शाहिद कपूरने भाऊ इशान खट्टरला दिला मोलाचा सल्ला; म्हणाला “स्वतःला…”

या ट्रेलरमध्ये आता नवीन भागात समोर येणाऱ्या कथेची हलकीशी झलक आपल्याला पाहायला मिळत आहे.सली परिवाराच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी, आणि इतरही बऱ्याच गोष्टींचा उलगडा या नवीन भागातून होणार आहे असं ट्रेलरमधून दिसत आहे. या अडचणींवर सली कुटुंब कशापद्धतीने मात करेल हेदेखील ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’मध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रेक्षक या दुसऱ्या भागासाठी प्रचंड उत्सुक आहेत. हा दूसरा भाग २० डिसेंबर २०२२ या दिवशी चित्रपटगृहात झळकणार आहे. ‘अवतार’ आणि ‘टायटॅनिक’ या चित्रपटाबरोबरच जेम्स कॅमरून यांनी प्रसिद्ध सीरिज ‘टर्मिनेटर’च्या पहिल्या २ भागांचं दिग्दर्शन केलं आहे. शिवाय १९८६ साली ‘एलियन्स’ हा सायन्स फिक्शन हा चित्रपटही जेम्स कॅमरून यांनी काढला होता जो प्रचंड हीट ठरला. ‘अवतार’चे आणखीन ३ भाग येणार असल्याचीसुद्धा चर्चा आहे. तिसरा भाग ‘अवतार : द सिड बेअरेर’ हा २०२४ मध्ये प्रदर्शित होणार अशी चर्चा आहे तर पुढचे २ भाग २०२६ आणि २०२८ या वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.