बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दिक्षित सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ऑनलाईन ब्लॉग्स, ट्विट्स, इन्स्टापोस्ट, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. यावेळी माधुरी ‘बडे मिया छोटे मिया’ या सुपरहिट चित्रपटामुळे चर्चेत आहे. १९९८ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आज तब्बल २२ वर्ष पुर्ण झाली आहेत. या निमित्ताने तिने चित्रपटातील एक विनोदी सीन शेअर केला आहे. या सीनमध्ये अमिताभ बच्चन आणि गोविंदा माधुरीला गुंडांपासून वाचवत आहेत. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

अवश्य पाहा – अक्षयच्या चित्रपटात ‘लव्ह जिहाद’? ट्रोलर्सने केली ‘लक्ष्मी बॉम्ब’वर बंदी घालण्याची मागणी

अवश्य पाहा – निया शर्माची आजीबाईंसोबत ‘झिंगाट फुगडी’; व्हिडीओ होतोय व्हायरल…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बडे मिया छोटे मिया’ हा बॉलिवूडमधील एक सुपरहिट विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि गोविंदा यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. लक्षवेधी बाब म्हणजे दोघांचाही डबलरोल या चित्रपटात होता. शिवाय राम्या कृष्णन, रविना टंडन, परेश रावल, अनुपम खेर, कादर खान, सतीश कौशिक यांसारख्ये अनेक नामांकित कलाकार या चित्रपटात झळकले होते. माधुरी दिक्षितने या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. धमाल कॉमेडी आणि जबरदस्त अॅक्शन सीन्स यामुळे ९०च्या दशकात हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.