प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचे आज १६ फेब्रुवारी रोजी निधन झाले आहे. वयाच्या ६९ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. बप्पी लहरी यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकार सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हंसल मेहता यांनी ट्वीट करत बप्पी लहरी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘आणखी एक तारा निखळला. मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती’ या आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.

त्यानंतर अशोक पंडीत यांनी देखील ट्वीट केले आहे. ‘बप्पी लहरी यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्काच बसला. मला विश्वास बसत नाहीये की माझा शेजारी गेला. त्यांचे म्युझिक आमच्या हृदयात कायम आहे’ या आशयचे ट्वीट त्यांनी केले आहे.

अभिनेता अजय देवगण, रविना टंडन, सुभाष घई अशा अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बप्पी लहरी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

बप्पी लहरी यांना एप्रिल २०२१ मध्ये करोना संसर्गही झाला होता. त्यावेळी त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर ते काही दिवसांमध्येच बरे झाले. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांना प्रकृतीशी संबंधीत अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. त्यांचा मृत्यू ओएसए म्हणजेच ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप अॅप्नियामुळे मध्यरात्रीच्या सुमारास झाला, अशी माहिती रुग्णालयाचे संचालक डॉ. दीपक नामजोशी यांनी दिली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bappi lahiri passed away ajay devgn hansal mehta and other celebs mourn the loss of disco king avb
First published on: 16-02-2022 at 11:34 IST