आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर आधी टीव्ही जगत आणि नंतर बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री मौनी रॉय सध्या तिच्या लग्नाच्या वृत्तामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. मौनी रॉय लवकरच तिचा बॉयफ्रेंड सूरज नाम्बियारसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. पण त्याआधी ती पुन्हा एकदा तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर तिचे बिकिनी फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

मौनी रॉयनं तिच्या इन्स्टाग्रामवर नुकतेच काही फोटो शेअर केले आहे. ज्यात ती पिवळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये स्विमिंगपूलच्या कडेला एन्जॉय करताना दिसत आहे. मौनीनं इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केल्यानंतर काही वेळातच हे फोटो व्हायरल झाले. या फोटोमध्ये ती खूप हॉट दिसत असून तिचा हा अवतार चाहत्यांना घायाळ करत आहे.

मौनीनं सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर तासाभरातच २ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हे फोटो लाइक केले आहेत. लग्नाआधी मौनीचा हा हॉट आणि बोल्ड अवतार सर्वांच्या पसंतीस पडताना दिसत आहेत. मौनीच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांसह अभिनेत्री आशका गोराडिया आणि आमना शरीफ यांनींही कमेंट केल्या आहेत. दरम्यान अशाप्रकारे बिकिनी फोटो शेअर करण्याची मौनीची पहिलीच वेळ नाही. याआधी अनेकदा तिनं इन्स्टाग्रामवर बिकिनी तसेच बोल्ड फोटो शेअर केले आहेत. ज्याची बरीच चर्चा देखील झाली होती.

View this post on Instagram

A post shared by mon (@imouniroy)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिळालेल्या माहितीनुसार मौनी रॉय येत्या २७ जानेवारीला लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. ती दुबई राहणारा तिचा बॉयफ्रेंड सूरज नाम्बियारशी लग्न करणार आहे. या दोघांच्या लग्नाची सर्व तयारी झाली असून हे लग्न गोव्यात पार पडणार आहे. मौनी रॉयच्या या डेस्टिनेशन वेडिंगला तिचे कुटुंबीय आणि जवळचा मित्र उपस्थित असणार आहेत.