कन्नड अभिनेता दर्शन थूगुदीपा आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री पवित्रा गौडा यांना मंगळवारी (११ जून) चाहत्याच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पण, कोठडीत असलेल्या दर्शनसाठी पोलिसांनी बिर्याणी मागवल्याचे काही व्हिडीओ कन्नड टीव्ही चॅनेलने प्रसारित केले आहेत.

एका प्रसिद्ध चिकन आउटलेटमधील बिर्याणी पार्सल पोलीस स्टेशनमध्ये नेतानाचे व्हिडीओ समोर आल्यानंतर ते दर्शनसाठी ऑर्डर करण्यात आल्याच्या चर्चा सुरू होती. हत्येचा आरोप असणाऱ्या दर्शनला बिर्याणी दिल्याबद्दल सोशल मीडियावर लोकांनी पोलिसांवर टीका केली होती. पण आता बंगळुरू पोलिसांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

चाहत्याच्या खूनप्रकरणी अभिनेता दर्शन व त्याच्या गर्लफ्रेंडला सहा दिवसांची पोलीस कोठडी, जाणून घ्या हत्येचा घटनाक्रम

‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, बेंगळुरू पोलिसांनी स्पष्ट केलंय की बिर्याणी दर्शनसाठी मागवली गेली नव्हती. ती बिर्याणी पोलिसांच्या कबड्डी संघासाठी होती. दर्शनला तुरुंगात फक्त इडली देण्यात आली होती, असंही त्यांनी सांगितलं आणि बिर्याणी दिल्याचे वृत्त फेटाळले. आरोपींना चिकन बिर्याणी खायला देणं ही खूप जुनी पद्धत आहे. ती आरोपींनी गुन्ह्यांबद्दल माहिती द्यावी, यासाठी वापरली जाते, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं. “रात्रीच्या जेवणात बिर्याणी खाल्ल्यानंतर संशयितांना झोप लागते, पण आम्ही त्यांनी झोपू देत नाही आणि सारखे प्रश्न विचारतो. काही तासांनंतर ते जागे राहू शकत नाही आणि मग झोपायला मिळावं यासाठी खरं बोलतात,” असं ते म्हणाले.

‘पहला नशा’ शूट करताना पूजा बेदीचा स्कर्ट हवेत उडाला अन् पंखा घेऊन खाली बसलेला स्पॉट बॉय…, फराह खानने सांगितला किस्सा

दर्शन थूगुदीपा आणि त्याची गर्लफ्रेंड पवित्रा गौडा यांना मंगळवारी बंगळुरूमध्ये एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ३३ वर्षांच्या रेणुकास्वामी नावाच्या व्यक्तीने पवित्रा गौडा विरोधात सोशल मीडिया पोस्टवर असभ्य कमेंट केल्या होत्या. तसेच त्याने तिला आक्षेपार्ह मेसेज केले होते. याचा राग मनात धरून रेणुकास्वामीचा खून करण्यात आला. “पवित्रानेच रेणुकास्वामीला शिक्षा देण्यासाठी दर्शनला प्रवृत्त केलं आणि त्यानुसार कट रचण्यात आला,” असं पोलिसांनी सांगितलं.

वडिलांचा विरोध पत्करून केला प्रेमविवाह, आता अभिनेत्याने पत्नीवर क्रूरतेचे आरोप करत मागितला घटस्फोट, ५ वर्षांत मोडला संसार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेणुकास्वामी नावाच्या चाहत्याच्या हत्येप्रकरणी दर्शन, पवित्रा गौडा आणि इतर ११ जणांना मंगळवारी अटक करण्यात आली. या सर्वांना न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. २००२ मध्ये ‘मॅजेस्टिक’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण करणाऱ्या दर्शनचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. ‘कारिया’, ‘क्रांतिवीर संगोली रायण्णा’, ‘कलासिपल्य’ अशा सुपरहिट चित्रपटांसाठी तो ओळखला जातो.