‘भद्रकाली’ प्रॉडक्शन’च्या ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाने प्रेक्षकांची मनं जिंकली. २२ डिसेंबर २०१७ म्हणजेच सहा वर्षांपूर्वी या नाटकाचा शुभारंभ झाला. सहा वर्षांपूर्वी सुरू झालेला प्रवास आता अंतिम टप्प्यात आला आहे. विठुरायाच्या आशीर्वादाने आणि आपल्या प्रेम प्रतिसादाने भारावलेली ही ‘संगीत देवबाभळी’ ची नाट्य दिंडी विसावणार आहे. येत्या बुधवारी २२ नोव्हेंबर रोजी सायनच्या षण्मुखानंद सभागृहात या नाटकाचा शेवटचा प्रयोग संपन्न होणार आहे.

‘संगीत देवबाभळी’ या नाटकाने लाखो रसिकांसह अनेक दिग्गजांच्या मनाला भुरळ घातली. या नाटकाचा सहा वर्षांचा प्रवास इतका सहज आणि सोपा नव्हता. एक नवा विषय, नवीन लेखक, नवे कलाकार घेऊन व्यावसायिक रंगभूमीवर येणे तसे अवघड होते. परंतु भद्रकालीने हा प्रयोग केला आणि आपल्या साथीने तो यशस्वीही झाला.
आणखी वाचा : “लग्न आहे आमचं, छान झालंय डेकोरेशन…”; प्रसाद जवादेने अमृता देशमुखसाठी घेतला हटके उखाणा

यादरम्या करोनासारखं भयाण संकट येऊन गेलं, पण त्यानंतरही प्रेक्षकांचं प्रेम कमी झालं नाही, ते चंद्रभागेसारखं वाहतच राहिलं. याच प्रेमामुळे या नाटकाने सर्वाधिक ४४ पुरस्कार प्राप्त केले. त्याबरोबर लाखो रसिकांसह अनेक दिग्गजांच्या मनाला भुरळ घातली. मजल दरमजल करत अवघा महाराष्ट्र विठुमय करणारी ही ‘देवबाभळी’ आता ५०० व्या प्रयोगापर्यंत येऊन पोहोचली आहे.

‘संगीत देवबाभळी’ हे नाटक बंद करु नका, अशी विनंती अनेक प्रेक्षक करत आहेत. मात्र कुठेतरी थांबणं हे गरजेचं असतं, म्हणून ही वारी ५०० व्या प्रयोगापर्यंत नेऊन आपण थांबणार आहोत. महाराष्ट्रातला हा शेवटचा प्रयोग २२ नोव्हेंबर २०२३ रोजी सायन येथील श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृह येथे मोठ्या दिमाखात सादर होत आहे.

आणखी वाचा : “दिवाळीच्या दिवशी श्री राम घरी येणं निव्वळ योगायोग की…”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेकांनी हा प्रयोग अजूनही पाहिलेला नाही, तर काहींनी या प्रयोगाची पारायणं केली आहेत. अशा सर्व मायबाप रसिकांसाठी ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक पाहण्याची ही शेवटची संधी आहे. तेव्हा कार्तिकी एकादशीच्या पूर्वसंध्येला या विठू सावळ्या नाट्यकृतीसह हरीमय होण्यासाठी अवघे अवघे या, असे आवाहन संपूर्ण टीमकडून केले जात आहे.