बॉलीवूड अभिनेता राजकुमार रावचा ‘भूल चूक माफ’ हा शानदार चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडतोय. या कॉमेडी चित्रपटात राजकुमारबरोबर अभिनेत्री वामिका गब्बी मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटात तुम्हाला एक नवीन कंटेंट पाहायला मिळेल.

‘भूल चूक माफ’ २३ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला समीक्षकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘भूल चूक माफ’ प्रदर्शित होऊन १० दिवस झाले आहेत. रविवारी या चित्रपटाने अनेक दिवसांचा रेकॉर्ड मोडला. चला तर मग जाणून घेऊ की, त्याने किती कमाई केली आहे.

‘भूल चूक माफ’ ने रविवारी जोरदार कलेक्शन केले. राजकुमार रावच्या ‘भूल चूक माफ’ने पहिल्या दिवशी सात कोटींची कमाई केली. त्याच वेळी दुसऱ्या दिवशी त्याने वेग वाढवला आणि शनिवारी ९.५ कोटींची कमाई केली. अशा परिस्थितीत आता रविवारी त्याने चमत्कार केला आहे.

सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या अहवालानुसार, १०व्या दिवशी ‘भूल चूक माफ’ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ६.२५ कोटींची कमाई केली. अशा परिस्थितीत आता त्याचे एकूण कलेक्शन ५८.८५ कोटी झाले आहे. येत्या काळात तो आणखी शानदार कलेक्शन करेल, अशी अपेक्षा आहे.

‘स्त्री’चा विक्रम ‘भूल चूक माफ’ मोडू शकेल का?

‘भूल चूक माफ’ हा राजकुमार रावचा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. फक्त नऊ दिवसांत, राजकुमार रावने त्याच्या दोन चित्रपटांव्यतिरिक्त बॉलीवूडमधील सर्व रिलीज झालेल्या चित्रपटांच्या कलेक्शनला मागे टाकले आहे. त्यासह ‘भूल चूक माफ’ आता अभिनेत्याचा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता तो फक्त ‘स्त्री २’ (६२५.७० कोटी) व ‘स्त्री’ (१२९.६७ कोटी)च्या मागे आहे. चित्रपटाची कमाई ज्या गतीने होत आहे ते पाहता, तो ‘स्त्री’ (१२९.६७ कोटी) च्य कलेक्शनला मागे टाकू शकेल, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी ‘भूल चूक माफ’ला ७० कोटींपेक्षा जास्त कमाई करावी लागेल. हा आकडा गाठणे सोपे नाही. दुसऱ्या आठवड्यात राजकुमार रावचा चित्रपट कसा कामगिरी करतो हे पाहणे मनोरंजक असेल.