अभिनेता कार्तिक आर्यन, भुमी पेडणेकर व अनन्या पांडे या तिघांची मुख्य भूमिका असलेला ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटाचा ट्रेलर त्यातील एका संवादामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. वैवाहिक बलात्कारावरुन असलेल्या या संवादावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. ‘अशा प्रकारचे विनोद सहन केले जाणार नाही’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. या विरोधानंतर भुमीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रेक्षकांची माफी मागितली आहे.

”सेक्सच्या विषयाला चालना देणारा हा चित्रपट नाही. जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही माफी मागतो. प्रेक्षकांच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. चित्रपटाच्या टीममधल्या कोणत्याही सदस्याची तशी विचारसरणी नाही”, असं म्हणत भुमीने माफी मागितली.

आणखी वाचा : हे भगवान कितना बदल गया इंसान…ऋषी कपूर यांचं मार्मिट ट्विट  

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटात कार्तिक आर्यन हा चिंटू त्यागी या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील पतीची भूमिका साकारत आहे. तर भुमी त्याच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. यामध्ये अनन्या पांडे एका इंटर्नची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमधील कार्तिकच्या संवादावरुन वादाला तोंड फुटले आहे.

”बिवी से सेक्स मांग ले, तो हम भिकारी. बिवी को सेक्स मना कर दिया तो हम अत्याचारी और किसी तरह जुगाड लगा के उससे सेक्स हासिल कर ले ना तो बलात्कारी भी हम है”, असा संवाद कार्तिकच्या तोंडी आहे. यावरुनच प्रेक्षकांनी आक्षेप नोंदवला आहे.