छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय असलेला रिएलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’. खेळादरम्यान कलाकारांचे होणारे भांडण, मजामस्ती हे सगळंच प्रेक्षक अगदी चवीने बघतात. कित्येक कलाकरांना या शोमुळे प्रसिद्धी मिळाली. अभिनेत्री मीरा जगन्नाथही ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वातून घराघरात पोहचली. मीराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे.

मीराने रिक्षातून प्रवास करताना हा व्हिडीओ शूट केला आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यांची झालेली दुर्दशा व्हिडीओत स्पष्ट दिसून येत आहे. “बाबूजी जरा धीरे चलो” या गाण्यासह तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या पोस्टला तिने “डोळे बंद करा आणि रोलर कोस्टरचा आनंद घ्या”, असं कॅप्शन दिलं आहे. पावसाळ्यातील रस्त्यांची अवस्था दाखवणारा मीराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

हेही वाचा >> नागा चैतन्य-समांथाच्या घटस्फोटावर नागार्जुन यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले “माझा मुलगा आता खूश…”

मीराच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने कमेंट करत “नवीन आव्हान, रस्ता शोधा”, असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “रिक्षा बनली रोलर कोस्टर राइड, कमाल मीरा दी”, अशी कमेंट केली आहे. एका नेटकऱ्याने “हे मीसुद्धा अनुभवलं आहे”,असं म्हटलं आहे.

हेही वाचा >> ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकर करणार चित्रपटाचं दिग्दर्शन, पोस्ट शेअर करत म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार सामाजातील घडामोडींवर व्यक्त होत असतात. याआधीही अनेक कलाकारांनी रस्त्यांच्या अवस्थेबद्दल त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडली होती. आता मीरानेदेखील याबाबत व्हिडीओ पोस्ट करत रस्त्यांच्या दुर्दशेकडे लक्ष वेधून घेतलं आहे. मीराने मालिका आणि चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘येऊ कशी तशी मी’ नांदायला मालिकेतील तिने साकारलेली मोमोची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.