"ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का?" 'बिग बॉस' मराठीच्या चौथ्या पर्वाचा बोल्ड प्रोमो पाहून नेटकरी संतापले | big boss marathi season 4 bold promo release on social media fans angry reaction see video | Loksatta

“ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का?” ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाचा बोल्ड प्रोमो पाहून नेटकरी संतापले

‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र हा प्रोमो पाहून नेटकरी संतापले आहेत.

“ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का?” ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाचा बोल्ड प्रोमो पाहून नेटकरी संतापले
'बिग बॉस' मराठीच्या चौथ्या पर्वाचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र हा प्रोमो पाहून नेटकरी संतापले आहेत.

‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकरच या नव्या पर्वाचं सुत्रसंचालन करणार आहेत. ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वामध्ये कोण-कोणते स्पर्धक सहभागी होणार? याबाबत चर्चा सुरु असतानाच या पर्वाचे दोन प्रोमो सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आले आहेत. एका प्रोमोमध्ये स्पर्धक जोडीची झलक पाहायला मिळत आहे. पण प्रोमोमधील या जोडीचा बोल्ड अवतार पाहून नेटकऱ्यांना मात्र राग अनावर झाला आहे.

कलर्स मराठी वाहिनीकडून शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये एक स्पर्धक जोडी बोल्ड डान्स करताना दिसत आहे. ‘मोहे रंग लगा दे रे’ गाण्यावर डान्स करणाऱ्या स्पर्धकांचा चेहरा मात्र लपवण्यात आला आहे. ही स्पर्धक जोडी कोण? ही चर्चा सोशल मीडियावर सर्वाधिक रंगताना दिसत आहे. पण त्याचबरोबरीने त्यांचा बोल्ड अवतार पाहून नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला आहे.

मराठी गाणी संपली वाटतं, हे मराठी ‘बिग बॉस’चं आहे ना…, हा फालतूपणा आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का?, बॉयकॉट करायची वेळ आली अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. या प्रोमोमध्ये बोल्ड डान्स करणारं जोडपं कोण आहे? हे अद्यापही कळालेलं नाही. पण प्रोमो पाहून अनेक तर्कविर्तक लावले जात आहेत.

आणखी वाचा – बँक बॅलन्स संपला, घर चालवण्यासाठी पैसे हवे म्हणून शरद पोंक्षेंनी सुरु केला नवा व्यवसाय, म्हणाले, “मिठाई विकतो अन्…”

या प्रोमोमध्ये दिसणारी अभिनेत्री नेहा खान आहे असं अनेकांचं म्हणणं आहे. येत्या २ ऑक्टोबरला ‘बिग बॉस’ मराठीचा ग्रँड प्रीमियर सोहळा संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणार आहे. तसेच पुढील आठवड्यापासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता ‘बिग बॉस’ मराठीचं नवं पर्व प्रेक्षकांना पाहता येईल.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
‘हर हर महादेव’ चित्रपटात अभिनेता शरद केळकर साकारणार बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका ?

संबंधित बातम्या

“आरडाओरड करणाऱ्या लोकांमध्ये तो कायम…” रवीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर मराठी लेखकाची तिरकस पोस्ट
हॉलिवूडमधील महागडा घटस्फोट! अभिनेत्री किम कार्दशियनला कान्ये वेस्ट महिन्याला देणार तब्बल ‘इतके’ कोटी रुपये
नोरा फतेहीला डान्सरचा चुकीच्या पद्धतीने स्पर्श; व्हिडीओ व्हायरल
“तो माझ्यापेक्षा वयाने…” ऋतुराज गायकवाडबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सायली संजीवने केलेले उघडपणे भाष्य
“मी खरा आहे कारण…” मानसी नाईकच्या नवऱ्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“MPSC त उत्तीर्ण नाही झाला तरी गावाकडे…”, गोपीचंद पडळकरांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला
पुण्यातून व्यापाऱ्याचे अपहरण करणारा आरोपी राजस्थानमध्ये जेरबंद; प्रेमसंबंधातून अपहरणाचा प्रकार
शाहरुख खानने दिली मक्का मशिदीला भेट, प्रार्थना करतानाचे फोटो व्हायरल; कारण आहे एकदम खास
PAK vs ENG: पाकिस्तानी गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या, रावळपिंडी कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने केले सात विश्वविक्रम
पुणे: कात्रज प्राणी संग्रहालयातील गव्याचा मृत्यू